छत्रपती संभाजीनगर : हायकोर्ट सिंग्नलवर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पती-पत्नीने मारहाण केल्याच्या अवघ्या दोन तासानंतरच एन-११ भागात एका नशेडीने पोलिस कर्मचाऱ्यास मायबाप आणि लेकाने मिळून बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास सुदर्शननगरमध्ये घडला. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून तीन जणांच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. नशेडींकडून पोलिसांना मारहाणीच्या दोन तासांच्या अंतराने घडलेल्या घटनांमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
शुभम राजेंद्र रणयेवले, राजेंद्र रणयेवले, माया राजेंद्र रणयेवले (तिघे रा.नवजीवन कॉलनी, एन - ११, हडको) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी अंमलदार विनोद गजानन खरात हे सिडको ठाण्यात डायल ११२ वर ड्युटीवर होते. २२ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता डायल ११२ वर तुषार यांचा कॉल आला. त्यावरून अंमलदार खरात आणि कवाळे हे घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी आरोपी रिक्षा चालक शुभम रणयेवले हा प्रचंड नशेत होता. त्याने त्याची रिक्षा तुषार यांच्या कारला धडकली होती. तरीही तोच तुषार आणि त्यांच्या वहिनीला अश्लील शिवीगाळ करीत होता. पोलिसांनी तुषार यांना ठाण्यात येऊन तक्रार देण्याची समज देऊन आरोपी शुभमला ताब्यात घेतले. अंमलदार विनोद खरात आणि कवाळे हे शुभमला ठाण्यात घेऊन जात असताना तो पुन्हा तुषार व त्यांच्या वहिनीला शिवीगाळ करू लागला. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट अंमलदार खरात यांची कॉलर पकडून मारहाण सुरू केली. कवाळे हे व्हिडीओ बनवित असताना शुभम व त्याचे आई-वडील हे खरात यांच्याशी झटापट करीत असल्याचे दिसत आहे. यात खरात यांच्या वर्दीची लाइनयार्ड, नेमप्लेट, शर्टचे बटन तुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीला एक दिवसाची कोठडीआरोपी शुभम रणयेवले याला सिडको पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयात हजर केले, तेव्हा त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तो नशेच्या अंमलाखाली होता, असा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच शुभमचे इतर रेकॉर्ड पोलिस तपासत आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोपान नरळे करीत आहेत.
सिग्नलवरील मारहाणीत एक आरोपी अटकेतहायकोर्ट सिग्नलवर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना एका दारुड्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार रविवारी दुपारी ४:३० वाजता घडला होता. या प्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आली. त्यात मुख्य आरोपी सोमनाथ मुरलीधर गिरी यास सोमवारी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. दरम्यान, आरोपीची पत्नी अनिता हिस रात्र झाल्यामुळे घरी जाण्यास नियमानुसार परवानगी दिली होती. मात्र, आरोपी सोमवारी ठाण्यात हजर होण्याएवजी फरार झाली आहे.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar witnessed two police assault incidents. First, a couple assaulted officers at a signal. Later, a drunk man and his family beat an officer in N-11. One arrest has been made.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में पुलिस पर हमले की दो घटनाएँ हुईं। पहले, एक दंपति ने सिग्नल पर अधिकारियों पर हमला किया। बाद में, एक नशे में धुत व्यक्ति और उसके परिवार ने एन-11 में एक अधिकारी को पीटा। एक गिरफ्तारी हुई है।