शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

By संतोष हिरेमठ | Updated: November 30, 2024 19:42 IST

छत्रपती संभाजीनगरात एका चौकात मिनिटाला धावतात ९५ वाहने

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंभीर शेरा असून, शहर राज्यात चौथ्या क्रमाकांवर आहे. धूळ, घनकचरा, प्लास्टिकचा वापर, औद्योगिक वसाहतींसह वाहनांची वाढती संख्या प्रदूषणाला हातभार लावत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरात विविध प्रकारचे रासायनिक घटक असतात, जे आरोग्यासाठी हानीकारक ठरतात.

जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल २२ लाखांवर गेली असून, यातील ५० टक्के वाहने शहरातील रस्त्यांवर धावतात. शहरातील एका चौकात मिनिटाला ९५ वाहने धावत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. यातील अनेक वाहने धूर ओकत धावत होती. सिग्नलवर उभ्या काही वाहनांच्या नंबरवरून ‘पीयूसी’ची पडताळणी केली असता, काही वाहने ‘पीयूसी’शिवाय धावत असल्याचे आढळले. बाहेरगावाहून येणारी अवजड वाहने, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने शहरवासीयांचा ‘श्वास’ कोंडत आहे.

दुचाकीधारकांचे ‘पीयूसी’कडे दुर्लक्षचप्रत्येक वाहनाची पीयूसी तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु हा नियम केवळ चारचाकींसाठीच असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. दुचाकी घेतल्यानंतर पुन्हा कधीच पीयूसी काढली जात नाही. शहरात विनापीयूसी धावणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे.

जुगाड करून मिळते ‘पीयूसी’एखाद्या वाहनाला ‘पीयूसी’ नाकारणे, हे क्वचितच होते. जुने वाहन असले तरी सहजपणे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र मिळत असल्याची स्थिती आहे. ‘पीयूसी’ देणाऱ्या केंद्रांची तपासणी करण्याची खरी आवश्यकता आहे.

‘पीयूसी’ नसलेल्यांना ७२ लाखांचा दंडआरटीओ कार्यालयाने एप्रिलपासून आतापर्यंत ‘पीयूसी’ नसलेल्या २ हजार ३६७ वाहनांना ७२ लाख ९० हजार ५०० रुपये दंड ठोठावला. आतापर्यंत ६९ लाख ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पीयूसी सेंटरची संख्या-४०जिल्ह्यातील वाहनांची संख्याडिझेल वाहने - १,२१,४१३पेट्रोल वाहने- २०,७५,८७७एलपीजी वाहने- १३,९५८सीएनजी वाहने- ८,७५०इलेक्ट्रिक वाहने- ३२,०४५इतर- ९,६५१

वर्षाला ७० हजार ते ८७ हजार वाहनांची भरदरवर्षी ७० हजार ते ८५ हजार वाहनांची भर पडत आहे. जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल ८२ हजार ५२९ नवीन वाहने दाखल झाली. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८७ हजार ५६६ नवी वाहने रस्त्यावर आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांना सवालप्रश्न : ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर काय कारवाई होते?काठोळे : ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाते. ‘पीयूसी’ नसेल तर वाहन मालकाला २ हजार रुपये दंड होतो. वाहन अन्य व्यक्ती चालवत असेल तर ४ हजार रुपये दंड होतो.

प्रश्न : शहरात धूर सोडत धावणारी वाहने दिसतात?काठोळे : प्रत्येक वाहनधारकांनी ‘पीयूसी’ काढावी. वाहन धूर सोडत असेल तर दुरुस्ती केली पाहिजे. त्यानंतर ‘पीयूसी’ काढावे.

प्रश्न : जुन्या वाहनांची संख्या अधिक आहे का?काठोळे : जुन्या वाहनांचे प्रमाण कमी आहे. वाहन संख्या सुरुवातीपासूनची आहे. त्यातील अनेक वाहने आज रस्त्यावर नाहीत. जुन्या वाहनांची संख्या खूप कमी आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडी