छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा परिसरात एका अपार्टमेंटमध्ये सहा महिन्यांच्या 'अमेरिकन पिटबुल कॅफे' जातीच्या कुत्र्याची बॅट आणि रॉडने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी पीडित कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात २ ते ३ अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्टीतील गोंधळाचा वाद प्राण्याच्या जिवावरमिळालेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमधील एका भाडेकरूच्या खोलीत काही तरुण पार्टी करत होते. त्यांच्या गोंधळामुळे फिर्यादीचा भाऊ त्यांना समज देण्यासाठी गेला होता. याचा राग मनात धरून, काही वेळाने बाहेर कुत्र्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. कुटुंबाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तो बाहेरून लावलेला होता. खिडकीतून पाहिले असता, पार्टीसाठी आलेले तरुण 'कॅफे' नामक कुत्र्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसले.
धारदार शस्त्राने केले वारमारहाणीदरम्यान एका तरुणाने धारदार शस्त्राने कुत्र्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. एवढेच नाही, तर या संतापलेल्या तरुणांनी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घराच्या खिडकीचे आणि दरवाजाच्या काचांचेही मोठे नुकसान केले. कुटुंबाने आरडाओरडा केला असता, आरोपींनी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलीस हवालदार गोले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A six-month-old Pitbull was beaten to death in Chhatrapati Sambhajinagar after its owner objected to a noisy party. The attackers, angered by the complaint, brutally assaulted the dog with bats and rods and damaged the family's property. Police are investigating the heinous crime.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक छह महीने के पिटबुल को शोरगुल वाली पार्टी का विरोध करने पर बेरहमी से पीटा गया। शिकायत से नाराज हमलावरों ने कुत्ते पर बल्ले और रॉड से हमला किया और परिवार की संपत्ति को नुकसान पहुंचाया। पुलिस मामले की जांच कर रही है।