छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात रोज किती जणांना मोकाट कुत्रे चावतात, याची आकडेवारी वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल; पण ही सत्य स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तब्बल १९० हून अधिक नागरिक मोकाट कुत्र्यांच्या चाव्यानंतर उपचारासाठी सरकारी रुग्णालयांत दाखल होत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले अँटिरेबीज सिरम (एआरएस) इंजेक्शन शासकीय रुग्णालयांत उपलब्धच नसल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची धावपळ होत आहे. विशेष म्हणजे हेच इंजेक्शन खासगी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असल्याने आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मोकाट कुत्रा चावल्यानंतर अँटिरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) आणि अँटिरेबीज सिरम (एआरएस) द्यावे लागते. मोकाट कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचाराकडे, लस घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास रेबीजची लागण होण्याचा धोका ओढवतो. असे असताना घाटी, जिल्हा रुग्णालय आणि मनपाच्या आरोग्य केंद्रांत सध्या ‘एआरएस’चा ठणठणाट आहे. मोकाट कुत्रा चावल्यानंतर घाटी रुग्णालयात धाव घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिणामी, घाटीवर रुग्णांचा भार वाढत आहे; परंतु केवळ ग्रेड-३ म्हणजे गंभीर चावा घेतलेले रुग्णच घाटीत यावेत आणि इतर रुग्णांवर मनपाच्या आरोग्य केंद्रांत उपचार व्हावेत, अशी अपेक्षा घाटी प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
औषधी दुकानांवर ‘एआरएस’ची किंमत - ४५० रुपयेघाटीचा ३५ लाखांवर खर्च‘एआरएस’ आणि ‘एआरव्ही’ लसीपोटी घाटी रुग्णालयाने गेल्या काही कालावधीत ३५ लाखांचा निधी खर्च केला. मनपाकडूनही घाटीला ‘एआरव्ही’ लसी दिल्या जातात.
‘एआरव्ही’ कधी दिले जाते?- कुत्रा चावल्यानंतर जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये ‘एआरव्ही’ लस दिली जाते.- चावा, ओरखडा किंवा त्वचा फुटलेली असेल तर.- मोकाट कुत्र्यासह माकड आदी चावल्यानंतर.- जखम लहान असेल तर.
‘एआरएस’ कधी दिले जाते?- गंभीर चावा असल्यास दिले जाते.- चाव्याने खोल जखमा.- अनेक ठिकाणी चावे.- रक्तस्राव असलेली जखम.- चेहरा, मान, डोके, हात किंवा जननेंद्रियाजवळ चावा.- लहान मुलांवरील हल्ला.
मोकाट कुत्र्याच्या चाव्याचे रोज कुठे किती रुग्ण?घाटी : ९० ते १००जिल्हा रुग्णालय : ६० ते ७०मनपा आरोग्य केंद्र : १५ ते २०
निविदेला प्रतिसाद नाहीमनपाच्या सर्व ४० आरोग्य केंद्रांत ‘एआरव्ही’ दिले जाते. सध्या ‘एआरएस’ उपलब्ध नाही. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु कोणीही निविदा भरली नाही. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रांत मोकाट कुत्रा चावलेले रोज १५ ते २० रुग्ण येतात.-डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
केवळ गंभीर रुग्णच घाटीत यावेतघाटीत दररोज साधारणपणे मोकाट कुत्रा चावलेले ९० ते १०० रुग्ण येतात. यात २० ते ३० टक्के हे लहान मुले असतात. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. हे प्रमाणपत्र असलेली औषधी मिळविण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे सध्या ‘एआरएस’चा पुरवठा होण्यासाठी अडचणी आहेत. महापालिकेने आरोग्य केंद्रात ‘एआरव्ही’ दिले पाहिजे. केवळ ‘एआरएस’ आवश्यक असलेले गंभीर रुग्णच घाटीत आले पाहिजेत.-डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी
पाठपुरावा सुरूजिल्हा रुग्णालयात मोकाट कुत्रा चावलेले रोज ६० ते ७० रुग्ण येत आहेत. सध्या ‘एआरव्ही’ उपलब्ध आहे; परंतु ‘एआरएस’ उपलब्ध नाही. ते उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.-डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक
Web Summary : Sambhajinagar faces a daily surge of 190+ dog bite cases, straining hospitals. Anti-rabies serum (ARS) is scarce in government facilities, forcing patients to seek expensive private options. Vaccine is available but serum not.
Web Summary : संभाजीनगर में प्रतिदिन 190+ कुत्ते काटने के मामले आ रहे हैं, जिससे अस्पतालों पर दबाव बढ़ रहा है। सरकारी सुविधाओं में एंटी-रेबीज सीरम (एआरएस) की कमी है, जिससे मरीजों को निजी विकल्प तलाशने पड़ रहे हैं। वैक्सीन उपलब्ध है, सीरम नहीं।