शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातही ८० टँकर, ३५० फेऱ्या दररोज; डिसेंबरनंतर टँकरची संख्याही वाढणार

By मुजीब देवणीकर | Updated: November 24, 2023 19:59 IST

यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन हिवाळ्यात टँकर सुरू करावे लागले. शहरातही सध्या ८० टँकर दररोज ३५० फेऱ्या करीत आहेत. डिसेंबरनंतर शहरातही टँकरची संख्या वाढणार आहे. नागरिकांची मागणी आल्यास टँकरने पाणी देण्यात येणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. पाणीपुरवठा करणारे हे टॅंकर फक्त मनपाचे आहेत. मात्र, शहरातील खासगी टॅंक़रची संख्या यापेक्षाही अधिक आहे.

१ फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसाआड पाणी देण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात अतिरिक्त ८० एमएलडी पाणी वाढले तरी नो-नेटवर्क भागाला टँकरद्वारे पाणी दिले जाणार आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. परंतु, पाणी पुरवठा केला जात नाही, तेथे टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार असून टँकरची संख्या वाढली तरी चालेल. मात्र, पाण्यापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असेही प्रशासक यांनी नमूद केले.

४५ वसाहतींना ८० टँकरद्वारे पाणीशहरातील नो-नेटवर्क भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांकडून ठरावीक रक्कम घेण्यात येते. ८० टँकरद्वारे दररोज ३५० फेऱ्या होत आहेत. सिडको एन-५ च्या जलकुंभावरून ३१ टँकर, एन-७ च्या जलकुंभावरून २० टँकर, कोटला कॉलनी जलकुंभावरून १८ टँकर तर नक्षत्रवाडी येथून ८ या प्रमाणे टँकर सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी