शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण: ‘एआय’ने दिलेली उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहिली; २४ जणांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:22 IST

जि.प.च्या तीन थेट शिक्षकांचे थेट निलंबन, २१ जणांच्या निलंबनाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या केंद्रातील २४ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा नोंदविला. त्यातील तीन शिक्षकाचे जिल्हा परिषदेने निलंबन केले असून, उर्वरित २१ जणांच्या निलंबनाचे आदेश संबंधित संस्थाना दिल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

जैतापूर येथील केंद्रात परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वीच वर्गात सीसीटीव्ही बसविले होते. हे सीसीटीव्ही बंद असल्याचे तेथील केंद्रप्रमुखांसह शिक्षकांना वाटले. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत सर्वांच्या सहकार्यांने विद्यार्थ्यांना अर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) माध्यमातून तत्काळ प्रश्नांची उत्तर शोधून दिली जात होती. त्या उत्तरांच्या हस्तलिखित कॉपी तयार करून वर्गांमध्ये वाटल्या. सर्वच विद्यार्थ्यांना कॉपी न मिळाल्यामुळे एका बेंचवर दोन-तीन विद्यार्थी बसवले. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचे पथक केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करताना बसलेल्या जागेवर नंबर दुसराच आणि उत्तरपत्रिकेवरील नंबर वेगळाच आढळून आला. त्यानंतर अधिक सखोल पाहणी केल्यानंतर एकसारख्याच कॉपीच्या ९ चिठ्ठ्या सापडल्या. या सर्व प्रकारामुळे पथकाने सीसीटीव्ही तपासण्याचा निर्णय घेतला. ती पाहणी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची भांडाफोड झाला. विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तर ही ‘एआय’च्या माध्यमातून शोधलेली होती, असेही शिक्षण विभागाच्या पाहणीत समोर आले.

आरोपींमध्ये यांचा समावेशकन्नडच्या गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सबाहत नईमोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ जणांच्या विरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपींमध्ये पी.सी.आव्हाळे, आर.के.दरे, पी.ए. लहाने, संजय कारभारी कडवे, एस.टी.घुले, संतोष पंढरीनाथ भिंगारे, संजय धर्मराज दाभाडे, बी.जे. गायकवाड, बळीराम कचरू राठोड, गणेश भाऊसाहेब शेळके, राधा एकनाथ पेरे, नरेश भानुदास सोनवणे, सचिन रामदास सातदिवे, संतोष रावसाहेब लिहिणार, भागवत नथ्थू निर्मळ, एस.पी. बागुल, ऋषिकेश वसंतराव पाटील, अनंता बळवंत गाडेकर, प्रशांत रमेश धुमाळ, व्ही.एफ.बारवाल, करणसिंग हुकूमसिंग चंदवाडे, दीपक कैलास सोनवणे, बाळकृष्ण श्रावण साळवे आणि छाया नरसिंग मुंगे यांचा समावेश आहे.

जि.प.च्या तीन शिक्षकांचे निलंबनजिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन सीईओ अंकित यांनी बुधवारी केले. त्यात व्ही.एफ. बारवाल, एस.व्ही. बागुल आणि केंद्रप्रमुख बी.जे. गायकवाड यांचा समावेश आहे. उर्वरित २१ कर्मचाऱ्यांमध्ये १३ कर्मचारी राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जैतापूर, ५ कर्मचारी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय हातनूर आणि न्यू हायस्कूल देभेगाव येथील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या २१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश संबंधित संस्थांना दिले असल्याचेही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.

कठोर कारवाई करण्यात येईलपरीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा असणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या काळात सर्व कॅमेरे व्यवस्थित सुरू ठेवणे आवश्यक आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सीसीटीव्हीचे फुटेज जपून ठेवत परीक्षा संपताच शालेय शिक्षण विभागात जमा करणे बंधनकारक केले आहे.-अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Jaitapur Mass Copying: AI-aided Cheating Leads to Suspensions

Web Summary : In Jaitapur, mass copying during exams using AI led to 24 suspensions. Students used AI-generated answers. CCTV footage revealed the scheme, prompting swift action against involved staff.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी