रसायन खरेदीत घोळ !
By Admin | Updated: August 11, 2014 01:57 IST2014-08-11T01:48:56+5:302014-08-11T01:57:40+5:30
औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा विभागासाठी मागील दोन वर्षांत रसायन खरेदी केल्यामुळे त्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी सुरू केला आहे

रसायन खरेदीत घोळ !
औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा विभागासाठी मागील दोन वर्षांत रसायन खरेदी केल्यामुळे त्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी सुरू केला आहे. ११ आॅगस्टच्या सभेसमोर रसायन खरेदीला कार्याेत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेंतर्गत फारोळा येथे ५६ व १०० द.ल.लि. जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. दोन्ही शुद्धीकरण केंद्रात दररोज सरासरी १४५ ते १५० द.ल.लि. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत पाण्याचा गढूळपणा नष्ट करणे, पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. यावेळी तुरटी ग्रेड-१, पॉली अॅल्युमिनियम क्लोराईड (पीएसी) पावडर, ब्लिचिंग पावडर ग्रेड-१ व क्लोरिन या रसायनांचा वापर केला जातो. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात १६० टन पीएसी पावडर खरेदीला मान्यता देण्यात आली. सुमारे ५० लाख रुपयांची ती पावडर होती. त्याच काळात १८ लाख रुपयांची तुरटी खरेदी करण्यात आली. २०११-१३ या काळात ते रसायन खरेदी करण्यात आले आहे.
नगरसेवक म्हणाले....
शिवसेना नगरसेवक राजू वैद्य म्हणाले, पालिका प्रशासनाची ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. जे घटक नियमित लागणारे आहेत, ते लपून-छपून खरेदी करण्याची काहीही गरज नाही. यामध्ये गौडबंगाल असल्याचा संशय येतो आहे.