लोकमत कॅम्पस क्लबकरिता जालन्यात बुद्धिबळस्पर्धा
By Admin | Updated: November 5, 2014 00:57 IST2014-11-05T00:23:48+5:302014-11-05T00:57:28+5:30
जालना : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोकमत कॅम्पस क्लबकरिता ९ नोव्हेंबर रविवार रोजी विद्युतगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत कॅम्पस क्लबकरिता जालन्यात बुद्धिबळस्पर्धा
जालना : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोकमत कॅम्पस क्लबकरिता ९ नोव्हेंबर रविवार रोजी विद्युतगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत कॅम्पस क्लब, गायकवाड एज्युकेशन गु्रप आणि जिल्हा चेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शहरातील गोल्डन ज्युबली स्कूलमध्ये होणार आहे.
पहिली ते चौथी अ, पाचवी ते सातवी ब आणि आठवी ते इयत्ता दहावी क अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. अ गटाची स्पर्धा सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून खेळाडूंनी त्याकरिता १० वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी.
‘ब’ गटासाठी ही स्पर्धा दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. त्याकरिता खेळाडूंना १२ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.
‘क’ गटासाठी ही स्पर्धा दुपारी २.३० वाजता सुरू होणार असून त्याकरिता खेळाडूंना २ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येईल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना २०१४-१५ या वर्षाचे कॅम्पस क्लब सभासद कार्ड व चेस बोर्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी सबंधित विद्यार्थ्यांनी ९०११४९८७७९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)