छबिना मिरवणूक, सीमोल्लंघन उत्साहात
By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:10:02+5:302014-10-06T00:13:18+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी दसऱ्यानिमित्त ठिकठिकाणी वाजत-गाजत छबिना मिरवणूक काढून

छबिना मिरवणूक, सीमोल्लंघन उत्साहात
उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी दसऱ्यानिमित्त ठिकठिकाणी वाजत-गाजत छबिना मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सिमोल्लंघन खेळण्यात आले. यानिमित्त आपट्याची पाने सोने म्हणून लुटून एकमेकांना विजया दशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भवानी देवी मातेची
छबिना मिरवणूक
उमरगा : शहरातील कुंभारवाडा येथील भवानी देवी मातेची छबिना मिरवणूक शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाविकांचय ‘आई राजा उदो ऽऽ उदोऽऽऽ’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
कुंभारवाडा येथील श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष शकुंतलाताई मोरे, लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते देवीची आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. देवी मंदिर, जुनी पेठ, भीमनगर, राष्ट्रीय महामार्ग, शिवाजी चौक, महादेव मंदिरापासून परत ही मिरवणूक देवी मंदिरात आणण्यात आली. गळ्यात कवड्यांची माळ, हातात पोत घेऊन ‘आई राजा उदो उदो’ चा जयघोष करीत आराधी व भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास अजाबळी व अग्निप्रवेशाचा कार्यक्रम येथे पार पडला. दरम्यान, शहरातील कोळीवाडा येथील देवी मंदिराच्या छबिना मिरवणुकीतही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे पुजारी ईश्वर कावाले यांच्या हस्ते अजाबळीचा विधी पार पडला.
तसेच उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे जयभवनी मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाची सांगता शुक्रवारी भवानी मातेच्या छबिना मिरवणुकीने झाली.
यंदा नवमी व दशमी एकाच दिवशी आल्याने भवानी मातेची छबिना मिरवणूक दसऱ्या दिवशी (शुक्रवारी) रात्री दहा वाजता गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या ट्रॅक्टरमधून कुंकवाची उधळण करीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा समारोप शनिवारी सकाळी सहा वाजता हनुमान चौकातील भवानी माता मंदिराजवळ झाला. मिरवणुकीत ढोल, हालगी, ताशे, संबळ, पताका, पोतधारी महिला व पुरूष भाविक मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी उपसरपंच संजय वार, मनोज काजळे, मंडळाचे अध्यक्ष मारूती थोरे, उपाध्यक्ष विठ्ठल कराळे, कोषाध्यक्ष दिलीप भुसारे, तुकाराम लवटे, कुमार पवार, संजय जाधव, कमलाकर पांढरे, व्यंकट रामतिर्थे, उमाकांत तपसाळे, राजें’्र जाधव, राजू थोरे, महेश कराळे, कमलाकर शिंदे, संजय गुरव, किशोर साठे, चैतन्य जाधव, बबलू शिंदे, उमाकांत बाळेकर आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)