नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:32:29+5:302014-10-29T00:44:17+5:30

कळंब : मुलाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवित एकाची फसवणूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तिघाविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून कळंब पोलिस ठाण्यात

Cheating by showing bait for the job | नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक


कळंब : मुलाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवित एकाची फसवणूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तिघाविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून कळंब पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील पुनर्वसन सावरगाव येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी महादेव विठ्ठल टोपे हे त्यांच्या मुलासाठी नोकरी पाहत होते़ त्यांना मंडळ अधिकारी बबन विठ्ठल आडसूळ यांनी आपला मेहुणा सुभाष जाधव हा कृषी अधिकारी असून, अनेकांना त्याने नोकरी लावल्याचे सांगितले़ तुमच्या मुलाला कृषी खात्यात नोकरी लावतो असे म्हणत पाच लाख रूपये द्यावे लागतील, असेही आडसूळ यांनी सांगितले़ आडसूळ यांच्या सांगण्यानुसार मुलाला नोकरी लागेल या आशेने महादेव टोपे यांनी १४ डिसेंबर २०११ रोजी आडसूळ यांना तीन लाख रूपये बँकेतून काढून दिले़ नोकरीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने टोपे यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी कळंब पोलिस ठाण्यात या प्रकरणात धाव घेतली होती़ मात्र, तेथे त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी अ‍ॅड़ गोविंद जाधवर यांच्या मार्फत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाच्या आदेशावरून मंडळ अधिकारी बबन आडसूळ, सुभाष जाधव, दत्ता आडसूळ या तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून या तिघाविरूध्द फसवणुकीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Cheating by showing bait for the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.