आता आधारकार्डही बनावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:31 IST2017-07-28T00:31:48+5:302017-07-28T00:31:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : भारताचे नागरिक म्हणून ओळखीचा सरकारमान्य पुरावा म्हणून सर्वत्र आधारकार्ड मागितले जाते. मात्र, आधार कार्डमध्ये ...

आता आधारकार्डही बनावट!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारताचे नागरिक म्हणून ओळखीचा सरकारमान्य पुरावा म्हणून सर्वत्र आधारकार्ड मागितले जाते. मात्र, आधार कार्डमध्ये फेरफार सहज शक्य असल्याने त्याच्या गैरवापराचे प्रकार समोर येत आहे. बाणाची वाडी (ता.परतूर) येथे अशाच पद्धतीने एका महिलेच्या ‘आधार’वर दुसºयाच महिलेचा फोटो व अंगठा वापरून ४५ हजारांचे पीककर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या संदर्भात शंकर सवादे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली आहे. आपल्या मुलीचे नाव स्वाती शंकर सवादे, असे आहे. या नावाचे आधारकार्ड काढून एकाने त्याच्यावर दुसºया महिलेचा फोटा व अंगठा लावला.
त्या आधारे बँकेत खाते उघडून आष्टी येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या शाखेतून गत वर्षी ४५ हजारांचे पीककर्ज काढले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सवादे यांनी मूळ आधारकार्ड काढले. या पूर्वी काढलेल्या बनावट आधार कार्डचा पुन्हा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने सदर व्यक्तीवर कारवाई करावी. या पूर्वी आष्टी पोलिसांत या संबंधी तक्रार दिली असून, काहीच कारवाई झालेली नाही, असे तक्रारीत नमूद आहे. येथील तहसील कार्यालयाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या पडताळणीत बनावट आधारकार्ड आधारे अनुदान लाटणारे साठ बोगस लाभार्थी शोधून काढले होते. या प्रकारांमुळे आधारकार्डच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत आहे.