महाबीजकडून स्वस्त बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:51 IST2017-09-17T00:51:34+5:302017-09-17T00:51:34+5:30
रबी हंगामासाठी महाबीजकडून अनुदानित हरभरा बियाण्यांचे दर प्रति किलो २५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत

महाबीजकडून स्वस्त बियाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रबी हंगामासाठी महाबीजकडून अनुदानित हरभरा बियाण्यांचे दर प्रति किलो २५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सरासरी एक लाख हेक्टरवर हरभरा लागवडीचे नियोजन असून, त्यासाठी चार हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदा खरीप हंगामात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे मूग, उडीद व सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा आता रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांवर आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात हरभरा उत्पादन वाढीस प्राधान्य देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. महाबीजकडून शेतकºयांना अनुदावर उपलब्ध करून देण्यात येणाºया अनुदानित हरभरा बियाण्याचे दर कमी करण्यात आले आहेत.
गत वर्षी नऊ हजार रुपये क्विंटल दराने विक्री करण्यात आलेल्या देशी हरभरा वाणाची किमंत अडीच हजारांनी कमी करण्यात आली आहे. तर काबली हरभºयाचे दर बारा हजा रुपये क्ंिवटलवरून साडेनऊ हजार रुपये करण्यात आले आहेत. देशी वाणामध्ये उपलब्ध जॅकी, दिग्विजय तर काबली वाणामध्ये विराट, कॉक -२ या नावाने उपलब्ध हरभरा बियाणे शेतकºयांना २० ते ३० किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे अनुदानित बियाणे खरेदी केल्यानंतर शेतकºयांना एका बॅगमागे चारशे ते साडेचारशे रुपयांचा फायदा होणार आहे. रब्बी हंगामासाठी हरभरा, गहू, ज्वारी, करडईचे तीन लाख, ४६ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन महाबीजने केले आहे.