अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे आकर्षण
By Admin | Updated: September 4, 2014 00:19 IST2014-09-04T00:12:43+5:302014-09-04T00:19:01+5:30
मानवत : येथील ओंकार गणेश मंडळाच्या वतीने खंडेश्वर मंदिरात स्थापन केलेल्या गुजरात येथील अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे़

अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे आकर्षण
मानवत : येथील ओंकार गणेश मंडळाच्या वतीने खंडेश्वर मंदिरात स्थापन केलेल्या गुजरात येथील अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे़ या मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले़
ओेंकार गणेश मंडळाची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली़ तेव्हापासून या गणेश मंडळाच्या वतीने वेगवेगळे देखावे आजपर्यंत तयार केले गेले आहेत़ गतवर्षी तिरुपती बालाजीचा देखावा सर्व मानवतवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता़ या देखाव्यास पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली होती़ यावर्षी गुजरातमधील अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती ओंकार गणेश मंडळाने तयार केली असून, ही प्रतिकृती १४ बाय १४ चौरस फूट व ८ फूट उंचीची आहे़ हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे़ गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रमही घेतला जातो़ याशिवाय या गणेश मंडळाकडून खंडेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करून या झाडांना लाकडी गार्डही बसविण्यात आले आहेत़ यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर कडतन, उपाध्यक्ष कपील खके, सचिव किरण कच्छवे, कोषाध्यक्ष राज भाकरे, मंडळाचे सदस्य निखील कुलकर्णी, शैलेश तोडकरी, रामेश्वर हळनोर, गोपाळ पल्लोड, रवी दिशागत, यश कत्रूवार, किशोर कोळेकर, योगेश कांकरीया हे परिश्रम घेत आहेत़ देखावा पाहण्यासाठी नागरिकांची वाढलेली गर्दी पाहता पोलिसांकडूनही बंदोबस्त मिळत आहे़