आठ दिवसांत दाखल करणार आरोपपत्र
By Admin | Updated: November 16, 2015 00:41 IST2015-11-16T00:29:46+5:302015-11-16T00:41:11+5:30
औरंगाबाद : मुंबईतील शक्ती मिलची पुनरावृत्ती करणाऱ्या सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी

आठ दिवसांत दाखल करणार आरोपपत्र
औरंगाबाद : मुंबईतील शक्ती मिलची पुनरावृत्ती करणाऱ्या सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी ग्रामीण पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत.
२८ आॅगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी सुंदरवाडी शिवारातील शिवनेरी ढाब्याजवळील अंतर्गत रस्त्यावर गप्पा मारत थांबलेली असताना चार नराधमांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. शेतात नेऊन त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संपूर्ण पोलीस दल या घटनेने हादरून गेले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपली हद्द नसताना आरोपीच्या अटकेसाठी ग्रामीण पोलिसांना मदत केली.
ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कांचन चाटे, सहायक निरीक्षक महेश आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून शेख जमील शेख हुसेन, तालीब अली (हीनानगर), शेख तय्यब (सुंदरवाडी) आणि अश्फाक हुसेन पटेल (रा. हीनानगर) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक प्रिया थोरात यांनी तपास केला.