शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांची डागाळलेली प्रतिमा उंचवायचीयं !

By admin | Updated: August 9, 2015 00:30 IST

बीड : गावपातळीवरील अंतर्गत गटबाजीत ग्रामसेवक भरडले जात आहेत. त्यांच्यातील क्षमता जागृत करून डागाळलेली प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य ग्रामसेवक युनियन संघटना सरसावली आहे.

बीड : गावपातळीवरील अंतर्गत गटबाजीत ग्रामसेवक भरडले जात आहेत. त्यांच्यातील क्षमता जागृत करून डागाळलेली प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य ग्रामसेवक युनियन संघटना सरसावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावविकासासाठी सेवाभावी वृत्तीने काम करायचे असून, कामातील दर्जा वाढविण्यात येणार असल्याचे राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी सांगितले.जिल्ह्यात १ हजार २४ ग्रामपंचायती असून ६६५ ग्रामसेवक आहेत. यात ९६ ग्रामसेविकांचा समावेश आहे. राज्य व केंद्राच्या ८७ योजना व विविध अभियानांमध्ये ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक योजनांमध्ये तांत्रिक कामांचा समावेश असतो. ग्रामसेवकांना हा सर्व गाडा ओढावा लागतो. अनेकांकडे अतिरिक्त ग्रामपंचायतींचा भार आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना कायम कामात गुंतून रहावे लागते. शासनाचे विविध उपक्रम, योजना सामान्यांपर्यंत पोहोचविताना गावपुढाऱ्यांच्या अंतर्गत हेव्यादाव्यात ग्रामसेवकांचाच बळी जातो. ग्रामसेवकांवर हा अन्याय असल्याचे बडे यांनी सांगितले. गावाला खऱ्या अर्थाने गावपण द्यायचे असेल तर ग्रामसेवक ही जबाबदारी चोखपणे पार पाडू शकतो. मात्र, त्यासाठी गावकऱ्यांनी अंतर्गत, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामसेवकांना सहकार्य ठेवण्याची भावना जपायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.१६ आॅगस्टपासून बीडमधील ग्रामसेवक कॉलनीत योगशिबीर, तणावमुक्त शिबीर आयोजित केले जाणार आहे. याशिवाय ग्रामसेवक युनियनची स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लोकोपयोगी योजना, आयएसओ मानांकनासंदर्भात मार्गदर्शन, शासन निर्णय आदी माहिती अपडेट केली जाणार आहे.संवर्गाचे उच्चीकरण कराग्रामसेवक २४ तास लोकांच्या सेवेत दंग असतो. ग्रामविकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ग्रामसेवकांवरील जबाबदाऱ्या पाहता त्यांच्या संवर्गाचे उच्चीकरण व्हायला हवे, अशी अपेक्षा नारायण बडे यांनी व्यक्त केली. ग्रामसेविकांना प्रसुती रजा मिळायला हवी, असेही ते म्हणाले. १९९१ मध्ये ग्रामसेवकांचे जॉब चार्ट ठरविण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यात सुधारणा हवी, अशी मागणी त्यांनी केली. कोतवाल ते एमपीएससी परीक्षेपर्यंत ग्रामसेवकांना राबविले जाते. नियमित कामांऐवजी इतर कामे लादली जातात. याविरूध्द संघटना वेळोवेळी आवाज उठवत आली आहे. ७ वर्षे जिल्हासचिव म्हणून काम करताना अनेक आंदोलने करून ग्रामसेवकांना न्याय मिळवून दिला आहे. यापुढे देखील लढा कायम राहील, असा इशारा त्यांनी दिला.लॅपटॉप देणारग्रामसेवकांना शासनाकडून लॅपटॉप मिळण्याची वाट न पाहता ग्रामसेवक युनियनने पतसंस्थेच्या लाभांशातून सर्व ग्रामसेवकांना मोफत लॅपटॉप देण्याचे नियोजन केले आहे. १ जानेवारी २०१६ पर्यंत सर्व ग्रामसेवक अत्याधुनिक तंत्रज्ञान साध्य करून लॅपटॉप वापरतील, असे बडे म्हणाले. ग्रामसेवक भवन उभारणारयुनियनच्या माध्यमातून स्वनिधीतून ग्रामसेवकांच्या हिताचे कार्यक्रम घेतले जातात. मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. याशिवाय ७ हजार स्क्वे. फूटच्या जागेत भव्य ग्रामसेवक भवन उभारायचे आहे. तेथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार असून, ५० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे बडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)ग्रामसेवकांची आतापर्यंत केवळ वार्षिक संमेलने व्हायची. संघटनेने प्रथमच रविवारी बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य स्रेहमेळावा व ग्रामसेवकांसमोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे हे उद्घाटक तर जेष्ठ नेते हनुमंतराव मुरूडकर अध्यक्षस्थानी राहतील. प्रशांत जामोदे, एस. बी. तांबोळी, प्रवीण पवार, शिवाजीराव खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी केले.