श्री गणेश विसर्जनानिमित्त वाहतूक मार्गात बदल

By Admin | Updated: September 6, 2014 00:27 IST2014-09-06T00:25:03+5:302014-09-06T00:27:59+5:30

एक दिवसासाठी विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे़

Changes in the traffic route for Shri Ganesh Visarajan | श्री गणेश विसर्जनानिमित्त वाहतूक मार्गात बदल

श्री गणेश विसर्जनानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नांदेड : येत्या ८ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून मिरवणुका निघतात़ त्यामुळे मुख्य रस्त्यावर मिरवणुकीतील भाविक व वाहनांची गर्दी होवू नये यासाठी एक दिवसासाठी विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे़
त्यानुसार, आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौक, तरोडेकर मार्केट, महावीर चौक, जुना मोंढा पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे़ आनंदनगर - वसंतराव नाईक चौक डावी बाजू बंद, राजकॉर्नर, वर्कशॉप टी पॉर्इंट, श्रीनगर, आयटीआयची डावी बाजू बंद राहणार आहे़ राजकॉर्नर - तरोडा नाका जाण्यासाठी डावी बाजू बंद, आयटीआय - अण्णा भाऊ साठे चौकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद़ जुना मोंढा - बर्की चौक येण्या-जाण्यासाठी बंद़ अण्णा भाऊ साठे चौक - चिखलवाडी डावी बाजू जाण्यासाठी बंद़
तर पर्यायी मार्ग म्हणून वाहनधारकांनी आयटीआय चौक ते जुना मोंढ्याकडे जाण्या-येण्यासाठी आयटीआय चौक, अण्णा भाऊ साठे चौक, हिंगोलीगेट अंडरब्रीज, यात्रिनिवास, अबचलनगर, जुना मोंढा हा मार्ग सुरु राहणार आहे़ तरोडा नाक्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी तरोडानाका, राजकॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, आनंदनगर, नागार्जुना टी पॉर्इंट ते अण्णा भाऊ साठे चौक किंवा महाराणा प्रताप चौक, बाफना ओव्हरब्रीज व पुढे़ गोवर्धनघाट, बोरबन फॅक्ट्री, वजिराबाद भागातील वाहनांसाठी तिरंगा चौक, मुख्यालय गेट, पक्कीचाळ , लालवाडी, पिवळी गिरणी, काबरानगऱ डॉक्टर लेन, बसस्टॅड, रेल्वेस्थानक- हिंगालीगेट अंडरब्रीज व समोर किंवा बाफना टी पॉर्इंट व पुढे जाण्यासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे़
हबीब टॉकीज, बर्की चौक या मार्गावरील वाहतुकीसाठी बर्की चौक, धान्य मार्केट रोड, वाटमारी, निवास किंवा बर्की चौक ते लोहारगल्ली रोड, भगतसिंह चौक, अबचलनगर, यात्रिनिवास, बाफना पंप़ आनंदनगर चौक ते नागार्जुना टी पॉर्इंट वाहतुकीसाठी डावी बाजू बंद असल्यामुळे उजवी बाजू जाण्या-येण्यासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे़
सिडको-हडको भागातून आंबेडकर चौक ते धनेगांव चौक, वाजेगांव नाका, जुना पूल, देगलूर नाका व पुढे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल़
(प्रतिनिधी)

Web Title: Changes in the traffic route for Shri Ganesh Visarajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.