शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी उपमुख्यमंत्र्यांना ललकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 21:04 IST

तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत, केसीआर यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाणी, वीज प्रश्नावर तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आजच्या सभेतून आवाज उठविला. केसीआर यांनी नागपूर, विदर्भात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यावर फडणवीसांनी त्यांनी तुम्ही महाराष्ट्रात का येताय, तेलंगानाच सांभाळा, असे विचारल्याचे केसीआर म्हणाले. यावर केसीआर यांनी मी महाराष्ट्रातून निघून जाईन, पण या दोन गोष्टी करा, मगच, असे आव्हान दिले आहे. 

Chandrashekhar Rao Live: महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन

केसीआर यांची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा झाली. यामध्ये त्यांनी तलाठ्यांनाही लक्ष्य केले. तेलंगानात आम्ही तलाठी व्यवस्थाच संपवून टाकली आहे. मोदी सांगतात डिजिटलाझेशन करा, मग शेतकऱ्यांचे का केले जात नाहीय. आम्ही केलेय. तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत. ज्याच्या नशीबात हवे त्याला ते जमिन लिहून देतात. यामुळे आम्ही तेलंगानात तलाठी व्यवस्थाच बंद केली. शेकऱ्यांना एकरी १० हजार देतो, ते अधिकाऱ्यांमार्फत नाही. थेट देतो. शेतकऱ्यांचा विमा मृत्यू झाल्याच्या आठ दिवसांच्या आत घरी जाऊन पाच लाख रुपये दिले जातात. शेतकऱ्यांचे धान्य आम्ही तिथे जाऊन खरेदी करतो. त्याचा पैसाही थेट खात्यात जातो. कोणी दलाल नाही, असे केसीआर म्हणाले. 

शेतकऱ्यांनो येती जिल्हा परिषद निवडणूक तुमच्या हातात आहे. एकदा गुलाबी झेंडा फडकवा तुमच्या मागे काय काय नाही येत ते बघा. उपमुख्यमंत्री फडणवीस मला सांगत होते की तुमचे इकडे काय काम आहे. तुम्ही तेलंगानाच सांभाळा. मी त्यांना म्हणालो मी तेलंगाना सांभाळले, आता महाराष्ट्रात आलोय. देशात कुठेही जाऊ शकतो. शेतकऱ्यांना तेलंगाना जे देतेय ते द्या मी मध्य प्रदेशला जातो. करा तुम्हीच राज्य. महाराष्ट्रात पैशांची कमी नाहीय, मनाची कमी आहे, असे आव्हान केसीआर यांनी दिले.यानंतर मी तेलंगानात दलित बंधू मोहीम सुरु केलीय. फडणवीसांना मी सांगतो तुम्हीही दलित बंधू योजना सुरु करा. मी महाराष्ट्रातून निघून जातो, असे केसीआर म्हणाले.  

पाण्यावर काय बोलले...बीआरएस पक्षाने नागपूरमध्ये कायमस्वरुपी कार्यालय उघडले आहे. इथेही भाड्याने नाही तर कायमचे कार्यालय स्थापन करणार आहोत. इथे पाणी नाहीय, अकोल्यात नाहीय. पुण्यातून वकील आले ते म्हणाले तिथेही काही ठीक नाहीय. काय चाललेय इथे. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. नेहरुंच्या काळात काहीतरी योजना बनत होत्या, आता नालायक पक्षांमुळे देश सहन करत आहे. देशात पाणी वापरात आले पाहिजे तर चांगले बंधारे बांधले गेले पाहिजेत. झिम्बाब्बेमध्ये पाणी साठवले जाते. तिथल्यासारखे देशात तीन चार धरणे असायला हवीत. परंतू केले जात नाहीय. नवीन रचना, नवीन कायदे आणले नाहीत तर हे होणार नाहीत. पाण्याला समजण्यासाठी आपला देशा आजही मागे आहे. माणूस पाण्याला बनवू शकत नाही, असे केसीआर म्हणाले.  

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस