चंद्रशेखर मुंडेंचा गळा दाबून खून
By Admin | Updated: July 3, 2014 00:19 IST2014-07-02T23:39:16+5:302014-07-03T00:19:58+5:30
उस्मानाबाद : शहरातील मुंडेगल्ली भागात राहणाऱ्या चंद्रशेखर यशवंत मुंडे यांचा खून झाल्याची फिर्याद बुधवारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

चंद्रशेखर मुंडेंचा गळा दाबून खून
उस्मानाबाद : शहरातील मुंडेगल्ली भागात राहणाऱ्या चंद्रशेखर यशवंत मुंडे यांचा खून झाल्याची फिर्याद बुधवारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळच्या सुमारास समर्थ नगर परिसरात असलेल्या एका बिअरबारजवळ मुंडे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून याप्रकरणी प्रारंभी डॉ़ सुरेश करंजकर यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, बुधवारी अज्ञात इसमाने शेतीच्या अथवा पैशाच्या कारणावरून मारहाण करून चंद्रशेखर मुंडे यांना जिवे मारल्याची फिर्याद मयत चंद्रशेखर यांचे मेहुणे सुनील आसाराम बागल (रा. परभणी) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)