नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी चंदनशिव

By Admin | Updated: July 19, 2014 00:41 IST2014-07-18T23:59:28+5:302014-07-19T00:41:59+5:30

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २५ ते २७ जुलै दरम्यान लातुरात २१ वे नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे़

Chandan Shiva as president of Navodit Marathi Sahitya Sammelan | नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी चंदनशिव

नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी चंदनशिव

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २५ ते २७ जुलै दरम्यान लातुरात २१ वे नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे़ या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा़भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली आहे़
साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत प्रा़चंदनशीव यांची निवड जाहीर करण्यात आली़ यावेळी उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, सरचिटणीस दशरथ यादव, विश्वस्त सतीश मडके, ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड़अविनाश औटे, जिल्हाध्यक्ष प्रा़रामदास केदार, शहराध्यक्ष नयन राजमाने, डॉ़ज्ञानेश चिंते, निमंत्रक विकास पाटील उपस्थित होते़
नवेदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, सुरेश भट्ट, मंगेश पाडगावकर, द़मा़ मिरासदार, डॉ़जनार्दन वाघमारे, विश्वास पाटील, रा़रं़ बोराडे, गंगाधर पानतावणे, फ़मुं़ शिंदे, डॉ़आ़ह़ साळुंके, रतनलाल सोनग्रा यासारख्या दिग्गज साहित्यिकांनी भूषविले
आहे़ (प्रतिनिधी)
साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

Web Title: Chandan Shiva as president of Navodit Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.