दुचाकीचोरांचे पोलिसांना आव्हान; २४ तासांत चार ठिकाणी चोऱ्या
By Admin | Updated: July 22, 2016 00:42 IST2016-07-22T00:17:40+5:302016-07-22T00:42:23+5:30
बीड/ परळी : मागील २४ तासांत जिल्ह्यातून चार दुचाकी वाहने चोरीस गेली. त्यामुळे दुचाकीचालकांत खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी चार दुचाकी लंपास करुन चोरांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.

दुचाकीचोरांचे पोलिसांना आव्हान; २४ तासांत चार ठिकाणी चोऱ्या
बीड/ परळी : मागील २४ तासांत जिल्ह्यातून चार दुचाकी वाहने चोरीस गेली. त्यामुळे दुचाकीचालकांत खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी चार दुचाकी लंपास करुन चोरांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.
दीपक हरिश्चंद्र नागरगोजे (रा. प्रियानगर, परळी) या विद्यार्थ्याची दुचाकी (ंक्र.एमएच ४४ जे- ११३१) चोरांनी अरुणोदय मार्केट परिसरातून दुपारी लंपास केली. मारोती कोंडीबा मन्हाळे (रा. शिवाजीनगर, परळी) या मजुराची दुचाकी (क्र. एमएच १२ बीएक्स- २७७७) बसस्थानकासमोरुन पळवली. बीड शहरातूनही दोन दुचाकी चोरीस गेल्या. संतोष तुकाराम घुगे (रा. पांगरी ता. परळी) यांची दुचाकी (क्र. एमएच ४४ जे ३२२०) जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून सायंकाळी सात वाजता पळविली. समाधान पोपट गावडे (रा. पारगाव जि. उस्मानाबाद) या विद्यार्थ्याची दुचाकी (क्र. एमएच २३ व्ही- ८७५) बसस्थानकासमोरुन चोरांनी लंपास केली. दरम्यान, दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना तपास रखडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)