आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अडथळ्यांची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 00:03 IST2016-10-30T23:59:53+5:302016-10-31T00:03:07+5:30
आष्टी तालुक्यातील मंगरूळ सारख्या खेडेगावातील सोनाली तोडकर या मुलीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवून सिंगापुर येथे होणाऱ्या आॅलिम्पिकच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अडथळ्यांची शर्यत
गणेश दळवी आष्टी
तालुक्यातील मंगरूळ सारख्या खेडेगावातील सोनाली तोडकर या मुलीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवून सिंगापुर येथे होणाऱ्या आॅलिम्पिकच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत निवड झाली आहे. पण तिच्या सिंगापूर वारीवर अनिश्चिततेचे ढग आहेत ते तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे. ‘सुलतान’ चित्रपटाची आठवण करून देणारी सोनाली तोडकरची ही कहाणी आहे.
जिल्ह्यात सतत दुष्काळात होरपळणारा तालुका म्हणजे आष्टी तालुक्याचे आवर्जुन घेतलं जाते. याच तालुक्यात खेळाडू तयार होण्याचीही खाणच अनेक वर्षांपासून निर्माण झालेली आहे. तालुक्यातील मंगरुळ येथील महादेव तोडकर या शेतकऱ्याची मुलगी सोनाली हिला लहानपणापासुन खेळांची आवड होती. शाळा महाविद्यालयात असताना सोनालीने कुस्ती खेळाचे धडे गिरवले. तालुका, जिल्हा विभाग, राज्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सोनालीने गाजवल्या. नुकत्याच उत्तरप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सोनाली तोडकरने आपला खेळ करत रौप्यपदक मिळवत निवड समितीच लक्ष वेधून घेतलं. आता ती सिंगापूर येथे होणाऱ्या आशिया कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेत सोनाली तोडकर खेळणार आहे. पण ती खेळण्यासाठी गरज आहे ती पैशाची.
दरम्यान, ग्रामीण खेळाडूंमध्ये शारिरीक क्षमता, जिद्द असतानाही त्यांच्या यशाच्या मार्गात आर्थिक अडचणींचा डोंगर उभा असतो. त्यांच्यासाठी मदतीचे हात हवे आहेत.