‘आजारी’ आरोग्य प्रशासनावर ‘उपचारा’चे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:28 IST2017-08-08T00:28:02+5:302017-08-08T00:28:02+5:30
बीड जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिकारी कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे ‘आजारी’ पडली आहे. या प्रशासनावर ‘उपचार’ करून कारभार सुधारण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यापुढे असणार आहे

‘आजारी’ आरोग्य प्रशासनावर ‘उपचारा’चे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिकारी कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे ‘आजारी’ पडली आहे. या प्रशासनावर ‘उपचार’ करून कारभार सुधारण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यापुढे असणार आहे. नुकतीच दोघांनीही सूत्रे स्वीकारली असून, नवा गडी नवा राज आरोग्य प्रशासनात पाहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यात गतमहिन्यात कुपोषित बालके आढळल्याने राज्यभर खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अंगणवाडीत जाऊन चिमुकल्यांची तपासणी करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाºयांना दिले होते. तपासणीत पाटोदा, गेवराई भागात मोठ्या प्रमाणात तीव्र कुपोषित बालके आढळली. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे अहवालावरुन नुकतेच समोर आले आहे. ब्लिचिंग पावडर वापरली जात नसल्याने पाणी दूषित होते, असा अहवालही आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरोग्य प्रशासनाने तात्काळ ग्रामपंचायतींना पत्र पाठवून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले होते. हाच गलथान कारभार सुधारण्याचे मोठे आव्हान प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यासमोर आहे.