शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रे वाटप करणाऱ्या टोळीचे आव्हान

By admin | Updated: August 11, 2015 00:52 IST

गंगापूर तहसील कार्यालय परिसरात बनावट जात प्रमाणपत्र तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली असून ग्रामीण भागातील जनतेला लुबाडण्याचे काम जोरात सुरू आहे

गंगापूर तहसील कार्यालय परिसरात बनावट जात प्रमाणपत्र तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली असून ग्रामीण भागातील जनतेला लुबाडण्याचे काम जोरात सुरू आहे. कुठल्याच कागदपत्रांची मागणी न करता ५०० ते १००० रुपयांत १९९० मधील तत्कालीन तहसीलदारांची सही व तहसील कार्यालयाचा शिक्का असलेले प्रमाणपत्र सहज उपलब्ध होत असल्याने बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्यांची चंगळ होताना दिसत आहे. या टोळीवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान तहसील प्रशासनापुढे असून दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तहसील कार्यालय परिसरासह इमारतीच्या प्रवेशद्वारावर दलालांचा उपद्वव्याप सुरू आहे. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना अलगद हेरून आपल्या जाळ्यात ओढणे, त्यांची फसवणूक करून जात प्रमाणपत्र काढण्यासाठी नियमानुसार आवश्यक असलेल्या १५ ते २० कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, संचिका पूर्ण होताच तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचा अभिप्राय घेतल्यावर वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संचिका पाठवून जात प्रमाणपत्राची मान्यता घेतल्यावरच प्रमाणपत्र दिले जाते. ही प्रक्रिया पार पडेपर्यंत १५ दिवसांचा कालावधी लागतो. दलालांकडून कुठल्याच कागदपत्रांची मागणी होत नाही. शिवाय कोणत्याच अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत फक्त रकमेची मागणी केली जाते. कागदपत्र न देता आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळत असल्याने गरजू आपले तात्पुरते काम करून घेतो; मात्र त्याची मोठी फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो.अधिक माहिती घेतली असता १९९० मध्ये गंगापूर तहसील कार्यालयात राऊत नामक एक नायब तहसीलदार होते. त्या वेळचे तत्कालीन तहसीलदार सुटीवर गेल्यावर राऊत यांच्याकडे तहसीलदारपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. राऊत यांना पदभार मिळताच त्यांनी त्याच दिवशी शेकडो जात प्रमाणपत्रे वितरित केली होती. तेच प्रमाणपत्र आजही वितरित होत आहेत. हे प्रमाणपत्र कोण बनवतो, याचा तपास तहसील प्रशासनाने लावणे अत्यंत आवश्यक आहे. नसता हा प्रकार असाच सुरू राहिला तर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येतील. अशा प्रकारचे प्रमाणपत्र अधिकृत करण्यासाठी नंतर अडचणी निर्माण होत असल्याने प्रमाणपत्रधारकाची चांगलीच तारांबळ होत आहे. यात विशेषत: विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या प्रकरणी तहसीलदार दिनेश झांपले यांना विचारले असता ते म्हणाले, असे प्रकार तहसील आवारात होत असल्याची माहिती नाही; मात्र याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.