शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘चल रिक्षा में बैठ’;रिक्षाचालकाकडून तरुणींचा पाठलाग, मोपेडसमोर रिक्षा आडवी लावत लगट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 11:53 IST

रात्री पेट्रोल भरण्यासाठी निघाल्या होत्या मैत्रिणी

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीला अश्लील प्रश्न विचारल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका रिक्षाचालकाने दोन तरुणींचा पाठलाग करून ‘रिक्षात बसते का,’ अशी विचारणा केली. बुधवारी मध्यरात्री तरुणी मैत्रिणीसह बाबा चौकाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी चालक इम्रान खान सलीम खान (३५, रा. आमखास मैदान परिसर) याला शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

रोजाबागमध्ये राहणारी ३१ वर्षीय तरुणी १३ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजता मैत्रिणीसह मोपेडवर दुचाकीवरून बाबा चौकाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात होती. आमखास मैदानाजवळून रिक्षाचालकाने दोघींचा पाठलाग सुरू केला. एसटी विभागीय कार्यालयाच्या परिसरात अंधारात तिच्या दुचाकीसमोर रिक्षा आडवी उभी करून त्याने लगट करण्याचा प्रयत्न करत ‘चल रिक्षा में बैठ’ असे धमकावले. रिक्षात बसलेला दुसरा तरुण खाली उतरताच तरुणींनी मोबाइल काढत ‘पोलिसांना फोन करते’ म्हणत आरडाओरड सुरू केली. त्यामुळे दोघांनी पोबारा केला. सकाळी सहा वाजता तरुणीने मित्रासोबत क्रांती चौक ठाण्यात तक्रार दाखल केली.

रिक्षाचालकाचा अजब जबाबनिरीक्षक संतोष पाटील यांनी तत्काळ डीबी पथकाला तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आमखासपासून चालक तरुणींचा पाठलाग करत असल्याचे दिसते. पोलिसांनी तपास करून इम्रानला शुक्रवारी ताब्यात घेतले. चौकशीत मात्र त्याने अजब जबाब दिला. ओळखीच्या साजिदच्या सांगण्यावरून दुचाकीवर त्याची बहीण आहे, ती कुठे जात आहे, हे पाहायला आम्ही निघालो होतो, असे सांगितले; परंतु, आम्ही त्यांना थांबवताच दिसले की, ती साजिदची बहीण नव्हती. तरुणींनी आमच्या कानशिलात लगावली. घाबरून आम्ही निघत असताना आमची पुढे रिक्षादेखील उलटली, असे सांगितले. तरुणीने मात्र साजिद नावाच्या कुठल्याच तरुणाला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. साजिदचा शोध सुरू आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद