घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला

By Admin | Updated: August 30, 2016 01:19 IST2016-08-30T01:14:13+5:302016-08-30T01:19:34+5:30

औरंगाबाद : एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले. ही घटना २८ आॅगस्ट रोजी सकाळी स्वराजनगर येथे घडली.

Chakahala on the woman entering the house | घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला

घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला

औरंगाबाद : एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले. ही घटना २८ आॅगस्ट रोजी सकाळी स्वराजनगर येथे घडली. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याविषयी नागसेन जोगदंडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला घरी असताना जोगदंड धारदार शस्त्र घेऊन आला. यावेळी त्याने शिवीगाळ करून तुम्हाला येथे राहू देणार नाही, तुमचा खून करीन, अशी धमकी देऊन चाकूने वार करून जखमी केले.
दोन वाहनचालकांवर अपघातप्रकरणी गुन्हा
औरंगाबाद : भरधाव आणि हलगर्जीपणाने वाहने चालवून समोरासमोर टक्कर देणाऱ्या दोन वाहनचालकांविरोधात सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारचालक मुंजा मुंढे (रा. देवतपूर, ता. परळी, जि. बीड) आणि मोटारसायकलचालक मिलिंद साबळे (रा. सिद्धार्थनगर, हडको) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, २८ आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता स्वामी विवेकानंद उद्यानासमोरील रोडवर दुचाकीचालक राँग साईडने तर कारचालक वेगात आल्याने त्यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी सहायक फौजदार देवराव दांगोडे यांनी सरकार पक्षातर्फे तक्रार दाखल केली.
चारित्र्याच्या संशयावरून जावयाला मारहाण
औरंगाबाद : दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून पत्नीसह सासरच्या मंडळींनी एक जणाला बुटाने मारहाण क रून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना हडकोतील यादवनगर येथे २८ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. प्रमोद गायकवाड आणि तीन महिलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, उन्मेष खाबडे हे घरी असताना त्यांचा मेहुणा प्रमोद, मावस सासू आणि अन्य नातेवाईक तेथे आले. त्यांनी उन्मेष यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली.
भाड्याने घेतलेली कार पळविली
औरंगाबाद : भाड्याने घेतलेली कार परस्पर गायब केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी सिडकोतील आंबेडकर पुतळ्याजवळ घडली. सौदागर सपकाळ (रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा) आणि ज्ञानेश्वर ऊर्फ बाळू कुलथे (रा. मिसारवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. मेनीनाथ जाधव यांचा टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. २५ एप्रिल रोजी आरोपींनी त्यांच्याकडून कार भाड्याने नेली. त्यानंतर ती कार त्यांना परत न करता आरोपींनी ती गायब केली.

Web Title: Chakahala on the woman entering the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.