शेतात सालगड्यावर चाकूहल्ला
By Admin | Updated: February 10, 2015 00:29 IST2015-02-09T23:56:10+5:302015-02-10T00:29:23+5:30
परतूर : शेतात तुरीची सोंगणी करीत असलेल्या सालगडयास चौघांनी चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना परतूर तालुक्यातील बामणी शिवारात सोमवारी दुपारी घडली.

शेतात सालगड्यावर चाकूहल्ला
परतूर : शेतात तुरीची सोंगणी करीत असलेल्या सालगडयास चौघांनी चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना परतूर तालुक्यातील बामणी शिवारात सोमवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे हे चारही आरोपी तोंडाला कापड बांधून आले होते. या प्रकाराने परिसरातील शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. दुपारी १ वाजता भीमराव प्रभाकर सस्ते (रा. सोयंजना) हे आपल्या मालकाच्या शेतावर तुरीची सोंगणी करीत असतांना चार आरोपींनी त्यांच्यावर चाकूहल्ला केला. भिमराव सस्ते यांच्यावर चाकुने दोन्ही हातावर व शरीरावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चार अरोपी विरूध्द परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भर दुपारी घडल्याने खळबळ उडाली आहे.