शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

चैतन्यच्या अपहरणात दोन कोटी मिळाल्यानंतर जबाबदारीप्रमाणे होणार होते पैशांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:45 IST

हर्षलच्या आश्वासनानंतर कटाची आखणी : पिस्तूल पुरवणाऱ्याचा बिहारमध्ये शोध

छत्रपती संभाजीनगर : एन-४सारख्या उच्चभ्रू वसाहतीमधून मोठ्या बंगल्यातील मुलाचे अपहरण करायचे, त्याच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपये मिळाल्यानंतर जबाबदारीच्या महत्त्वाप्रमाणे पैशांचे वाटप होईल, या आश्वासनावर अपहरणकर्त्यांनी एकत्र येत कटाचे अंतिम नियोजन केले होते, अशी बाब चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात उघडकीस आली आहे.

४ फेब्रुवारी रोजी रात्री एन-४मधून चैतन्याच्या अपहरणाने शहर हादरले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या तत्परतेने चैतन्य सुखरूप घरी परतला. मात्र, शहरात दहशत पसरली. देवळाई, बेगमपुऱ्यात दोन जणांना अपहरणाच्या संशयातून बेदम मारहाणदेखील करण्यात आली. चैतन्याच्या अपहरणकर्त्यांना मंगळवारी सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी न्यायालयात हजर केले. कुटुंबाकडून वकील नियुक्त न केल्याने विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकन्यायरक्षक ॲड. कन्हैया शर्मा, शिवशंकर फटाड, विशाल काकडे यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. न्यायालयाने आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हे आहेत अटकेत-ज्ञानेश्वर उर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (२१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०) हर्षल विनोद चव्हाण (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी, ता. जाफराबाद), शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा. आळंद), विवेक उर्फ साजन विभुती भूषण (२४, रा. जि. भोजपूर, बिहार).

या मुद्द्यांवर होणार तपास-हर्षलने बिहारला जाऊन पिस्तूल कोणाकडून घेतले, यासाठी पोलिसांचे पथक बिहारमध्ये तपास करणार.-आरोपींना अपहरणासाठी आणखी कोणी उद्युक्त केले, कोणी मदत केली ?

चैतन्यने प्रात्यक्षिक दाखवलेतो झोपेत नसल्याने आरोपींनी त्याचा गळा कसा दाबला, हे चैतन्यने हातवारे करून पोलिसांना दाखवले. त्यामुळे पोलिसांनी यात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवले. दरम्यान, पोलिस आता ती दोरी जप्त करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर