शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतरही दुसऱ्या गाडीमधून चैतन्य तुपेला पळवून नेण्याचा प्रयत्न; असे पकडले अपहरणकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:55 IST

८ जिल्ह्यांचे अधीक्षक, २ राज्यांच्या अतिरिक्त संचालकांशी संपर्क, ३१ अधिकारी, १५० अंमलदार तपासकामी

छत्रपती संभाजीनगर/भोकरदन : चैतन्यच्या २ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. आरोपींच्या अटकेपेक्षा मुलगा सुखरूप हवा, असा संदेश देत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ३१ वरिष्ठ अधिकारी, १५० अंमलदारांना तपासकामी लावले. अपहरणकर्ते राज्याबाहेर न जाण्यासाठी ८ जिल्ह्यांचे पाेलिस अधीक्षक, २ राज्यांच्या अतिरिक्त पोलिस संचालकांना अलर्ट कळविला होता.

मंगळवारी रात्री घटना समजताच, पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक कुंदन जाधव यांनी पोलिस आयुक्तांना कळविले. उपायुक्त शिलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील, मनोज पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, कुटुंबाने पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. सायबर, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ आयुक्तालयात दाखल होण्याचे आदेश जारी झाले. निरीक्षक संदीप गुरमे, गीता बागवडे, संभाजी पवार यांच्याकडे मुख्य तपास देण्यात आला. रात्री २ वाजता आरोपींनी चैतन्याचे वडील सुनील तुपेंना केलेला काॅल तळेगावमधून केल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुंके तत्काळ रवाना झाले. पहाटेपर्यंत ते आसपासच्या वस्त्यांवर अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते.

सकाळी पोलिसांशी संपर्कगुन्हे शाखा तळेगावमध्ये शोध घेत असताना, अपहरणकर्त्यांच्या कारचा १ वाजता भोकरदनमध्ये अपघात झाला, पण कटाचा सूत्रधार हर्षलचे सर्व लक्ष चैतन्यवर होते. त्याने तत्काळ त्याला घेत जीवन, बंटी, कृष्णासह अंधारात पोबारा केला. जखमी प्रणवला रुग्णालयात दाखल केल्याने त्याला पळण्याची संधी मिळाली नाही.

सुसाट कार दोनदा उलटलीअपहरणकर्त्यांनी कारमध्ये दारू ढोसली. हसनाबाद, भोकरदनमार्गे जाफराबादकडे सुसाट जाताना रात्री १ वाजता आसई पाटीजवळ मालवाहू गाडीला त्यांची कार धडकली. अतिवेगामुळे कार खांबाला धडकून दोन वेळेस उलटून सुखदेव जाधव यांच्या शेतात जाऊन पडली. यात गाडीचा चक्काचूर झाला. एअरबॅग्ज उघडल्याने समोर बसलेला चैतन्य व इतरांना मोठी दुखापत झाली नाही.

तरीही चैतन्याला पळवायचे होतेअपघातानंतरही हर्षलला चैतन्याला पळवून न्यायचे होते. शिवराज एका व्यक्तीच्या गाडीवरून गावात पोहोचून सकाळी जेसीबीवर कामावर निघून गेला. जीवनने प्राथमिक उपचार घेत जाफ्राबाद बस स्थानकावर रात्र काढली. हर्षलचे तरीही चैतन्यला पळवून नेण्याचे प्रयत्न सुरू होते. भाऊ संकेतला कॉल करून त्याच्या मदतीने ब्रह्मपुरी-मंगरुळ शिवारातील शेतामध्ये लपून बसला.

दबाव तंत्राचा वापरसकाळी ७ वाजता भोकरदन पोलिसांना ती कार संशयास्पद वाटली. अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना ही बाब कळताच त्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, तळेगावातील गुन्हे शाखेने प्रणवकडे धाव घेतली.

घटनाक्रम उलगडलाप्रणवच्या चौकशीत घटनाक्रम उलगडत गेला. अपहरणकर्त्यांची ओळख स्पष्ट झाली. उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुके यांनी तत्काळ जीवन, शिवराज व कृष्णाला गावातून उचलले. त्यांच्या चौकशीत हर्षल हा त्याचा सख्ख्या भाऊ संकेतसोबत गेल्याचे समजले. पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतले. पण संकेत तोंड उघडत नव्हता. त्यांच्या आई-वडिलांच्या अटकेचे नाटक पोलिसांनी करताच, संकेतने हर्षलचा पत्ता सांगितला. बोडखे यांनी शेतात धाव घेत हर्षलला पकडले.

५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंदज्ञानेश्वर उर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (२१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०, चौघेही रा.ब्रह्मपुरी, ता.जाफ्राबाद), शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा.आळंद) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

यांची उल्लेखनीय कारवाईभोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत दराडे, निरीक्षक किरण बिडवे, संदीप गुरमे, गीता बागवडे, सायबरचे कदिर देशमख, विनायक शेळके, काशीनाथ महांडुळे, विशाल बोडखे, संदीप सोळुंके, प्रमोद देवकाते, गणेश केदार, अर्जुन कदम, पुंडलिकनगरचे कुंदन जाधव, सुनील म्हस्के, टेंभुर्णीचे सचिन खामगळ, सागर शिंदे, पवन राजपूत यांनी अखंड चोवीस तास मोठी मेहनत घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर