प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:01 IST2017-09-02T00:01:27+5:302017-09-02T00:01:27+5:30
लातूरची फेरी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु केलेल्या जात पडताळणी विभागात सदस्य व सदस्य सचिव वगळता अध्यक्षपदच रिक्त असल्याने सुरुवातीपासूनच प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदर आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव निकाली निघण्यास अडचणी येत आहेत.

प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लातूरची फेरी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु केलेल्या जात पडताळणी विभागात सदस्य व सदस्य सचिव वगळता अध्यक्षपदच रिक्त असल्याने सुरुवातीपासूनच प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदर आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव निकाली निघण्यास अडचणी येत आहेत.
पूर्वी जातपडताळणीसाठी लातूर ेयेथे पायपीट करावी लागत होती. यात पहिल्या फेरीत प्रस्ताव निकाली निघेलच, याची शाश्वती नसायची. त्यामुळे ही पायपीट थांबविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीच जातपडताळणी विभाग सुरु केला आहे. मात्र महत्त्वाचे असलेले अध्यक्षपदच रिक्त असल्याने प्रस्ताव दाखल केलेल्यांना येथेही खेटे घेतल्याशिवाय पर्याय नाही. येथे सदस्य भरत केंद्रे आणि सदस्य सचिव म्हणून छाया कुलाल हे दोन पदे भरलेली आहेत. मात्र अध्यक्षासाठी दर वर्षी प्रभारीवरच भिस्त आहे.परिणामी, प्रस्ताव त्रुटीत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. आॅगस्टमध्ये अहमदनगर येथील जातपडताळणीचे अध्यक्ष प्रकाश वायचाळ हे यांच्या उपस्थितीत ५५० प्रस्ताव निकाली काढल्याचे सदस्य भरत केंद्रे यांनी सांगितले. तर जुलैअखेर १२६७ तर आॅगस्ट मध्ये ७४३ प्रस्ताव प्रलंबित होते. पूर्वी हिंगोली येथे कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्याकडे पदभार दिल्याने ते ५ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी येणार आहेत. मात्र सुनावणीत नेमकी कोणती प्रकरणे मांडण्यात येणार आहे. यावर सद्यातरी चर्चा झालेली नाही. मात्र क्लिष्ट असणारी प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली जाणार असल्याचे केंद्रे म्हणाले.