शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जिल्हा बँकच्या अध्यक्षपदाची आज होणार निवड; संचालक मंडळाचा कल अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:34 AM

विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ‘मनातील अध्यक्ष कोण’ यावरही बरेसचे अवलंबून

ठळक मुद्देनितीन पाटील प्रबळ दावेदार  आज होणार निवड प्रक्रिया

औरंगबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड येत्या १३ जून रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या संचालक मंडळ बैठकीच्या सभागृहात होत असून, त्याआधी सर्व संचालक एकत्रित येऊन कुणाला अध्यक्ष करायचे, हे ठरवतील व नंतर निवड प्रक्रियेला सामोरे जातील. सकाळी ११ वा. विभागीय सहनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेस प्रारंभ होईल. 

सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी दादांचे पुत्र नितीन पाटील हे प्रबळ दावेदार ठरत आहेत. स्वत: नितीन पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. मतदार असलेल्या संचालकांच्या ते गाठीभेटी घेऊन आपण अध्यक्ष होण्यास इच्छुक असल्याचे व सहकार्य करण्याचे सांगत आहेत. प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की, अध्यक्षपदी नियुक्ती होण्यास मला तशी फारशी अडचण वाटत नाही. इच्छुकांची संख्या एकापेक्षा अधिक नक्कीच असली तरी अवघ्या काही महिन्यांसाठी हे अध्यक्षपद असल्याने ते नितीन पाटील यांना देऊन सुरेशदादांनी केलेल्या सहकार्यातून उतराई होऊ या, अशी एक मानसिकता दिसून येत आहे. त्याचा फायदा नितीन पाटील यांना नक्कीच होऊ शकतो. हरिभाऊ बागडे, रामकृष्णबाबा पाटील, आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. 

नितीन पाटील नको या भूमिकेतून काही संचालक हालचाली करीत असले, तरी त्यांना बहुमत मिळविण्यात बरीच मेहनत करावी लागणार आहे. १३ जून रोजी अध्यक्षपदासाठी एकमत होऊ शकते की मतदानास सामोरे जावे लागते, हे त्यादिवशी सकाळी होणाऱ्या बैठकीत समजू शकेल. बँकेचे एक संचालक जावेद पटेल यांनी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमास संचालकांना निमंत्रित केले होते. त्यावेळी अनेक संचालक आले; पण  अध्यक्षपदावर त्यांची चर्चा झाली नाही. 

११ संचालक पात्रएकूण १९ संचालक मतदानास पात्र आहेत. त्यात भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादीचे तीन व उर्वरित काँग्रेसचे आणि अपक्ष आहेत. बँकेचे ज्येष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ‘मनातील अध्यक्ष कोण’ यावरही बरेसचे अवलंबून आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादbankबँकHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे