परतूरमध्ये सभापतीचे पती, उपसभापतींमध्ये हाणामारी

By Admin | Updated: January 19, 2015 00:54 IST2015-01-19T00:36:52+5:302015-01-19T00:54:08+5:30

परतूर : परतूर पंचायत समितीत सभापतींचे पती आणि उपसभापती यांच्यात रविवारी फिल्मीस्टाईल हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली. फंडाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सागंण्यात येते.

The chairmanship of the chairmanship of the chairmanship in the constituency, the sub-contest | परतूरमध्ये सभापतीचे पती, उपसभापतींमध्ये हाणामारी

परतूरमध्ये सभापतीचे पती, उपसभापतींमध्ये हाणामारी


परतूर : परतूर पंचायत समितीत सभापतींचे पती आणि उपसभापती यांच्यात रविवारी फिल्मीस्टाईल हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली. फंडाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सागंण्यात येते.
पंचायत समितीस आलेला फंड इतरत्र वळविण्याच्या व समान वाटपाच्या कारणावरून दुपारी तीनच्या सुमारास परतूर पंचयात समितीच्या सभापतींचे पती हरीराम माने व उपसभापती तुकाराम बोनगे यांच्यात आधी बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर नंतर एकमेकाचे कपडे फाटेपर्यंत हाणामारीत झाले. पंचायत समितीच्या इमारतीतच ही हाणामारी झाली. या घटनेने पंचायत समितीतील उपस्थित लोक व कर्मचारी चांगलेच आवाक् झाले. हा प्रकार नंतर परतूर पोलिसांत गेला.
मात्र भाजपाच्या काही नेत्यांनी हस्तक्षेप करून समजूत घालून गुन्हा दाखल होऊ दिला नाही. मात्र या प्रकाराने पंचायत समितीच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली गेली. फंड येवून बरेच दिवस झाले. मात्र हा फंड उपसभापती व सदस्यांना विश्वासात न घेता सभापती व गटविकास अधिकारी वापरण्याच्या तयारीत असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. शेवटी ही धूसफूस या हाणामारीतून बाहेर आली. दरम्यान सभापतीचे पती व उपसभापती यांच्यात निवडीपासूनच बेबनाव झाला असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)
यासंदर्भात हरिराम माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हे आमचे दिल्लगीतमध्ये भांडण झाले. त्यात फारसे विशेष नाही. तुकाराम बोनगे यांचा मोबाईल मात्र स्वीच आॅफ लागत होता.

Web Title: The chairmanship of the chairmanship of the chairmanship in the constituency, the sub-contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.