वैद्यनाथ कारखान्याचा अध्यक्ष आज ठरणार
By Admin | Updated: May 11, 2015 00:34 IST2015-05-11T00:11:51+5:302015-05-11T00:34:31+5:30
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया होत आहे. या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

वैद्यनाथ कारखान्याचा अध्यक्ष आज ठरणार
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया होत आहे. या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
कारखाना संचालकपदाच्या २० जागेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. २८ रोजी निकाल जाहीर झाला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे वैद्यनाथ पॅनलने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडवित एकहाती सत्ता काबिज केली. २० पैकी २० जागा जिंकून पालकमंत्री पंकजा यांनी कारखान्यातील सत्ता अबाधित राखली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सोमवारी कारखानास्थळी संचालकांची विशेष बैठक बोलावली आहे. सकाळभ ११ वाजेपासून प्रकियेस सुरुवात होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
कारखाना अध्यक्षपदासाठी पालकमंत्री पकंजा मुंडे यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. अॅड. यशश्री मुंडे यांच्याकडे देखील कारखान्याची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन बहिणींपैकी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. उपाध्यक्षपदासाठी मातब्बर संचालकांनी ‘फिल्डींग’ लावलीय.