शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र? पुन्हा दोन मुली आढळल्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:59 IST

दोन ते तीन महिन्यांपासून वाळुजमध्ये वास्तव्य, तरी एटीएस, स्थानिक पोलिस अनभिज्ञ

छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशातील दोन वीस वर्षांच्या मुलींची पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे शहरात तस्करी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघींची गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना शहरात का आणण्यात आले, याचा गुन्ह्यात उल्लेख नसल्याने त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यांना अवैधरीत्या हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी हॉटेलचालक आकाश नाना त्रिभुवन (वय २९, रा. आंबेडकरनगर) याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड बायपासवरील व्हाईट हाऊस लॉजमध्ये दोन बांगलादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती शहर पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजेश मयेकर, सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सहकाऱ्यांसह तेथे छापा टाकला. त्यात बांगलादेशी वीस वर्षांच्या दोन मुली आढळल्या. महिला अधिकाऱ्यांनी दोघींना ताब्यात घेतले.

आम्ही नदीमार्गे आलो...दोन्ही मुलींच्या बांगलादेशमधील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. चौकशीतील त्यांच्या दाव्यानुसार, चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांनी नदीमार्गेे देशाची सीमा ओलांडून, लष्कराच्या गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केला. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी वाळुजमधील हॉटेलमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांपूर्वीच तस्करांनी त्यांना गांधेली फाटा परिसरातील व्हॉईट हाऊस लाॅजिंगमध्ये नेले होते. मात्र, त्यांना देशात, शहरात आणण्याचा उद्देश काय, काेणी आणले, याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांची पोलिस चौकशी करत आहेत.

बांगलादेशींच्या तस्करीसाठी शहरात कायमच केंद्रस्थानी-मे २०२५ मध्ये झाल्टा फाटा परिसरात बांगलादेशी मुलींना देहविक्रीसाठी तस्करी करून आणण्यात आले होते. यात हॉटेलचालक अभिजित बाळासाहेब जाधव (मूळ रा. घनसावंगी) याला अटक झाली होती.-जानेवारी २०२४ मध्ये कोलकाता, पुणे मार्गे शहरात १६ वर्षीय बांगलादेशी मुलीची तस्करी करण्यात आली होती.-विधान परिषदेच्या उपसभापती यांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र बनल्याच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती.

एटीएस, स्थानिक पोलिस अनभिज्ञ कसे ?अवैधरीत्या शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांबाबत माहिती मिळवून कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यत्वे दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) असते. एटीएसकडून मात्र केवळ व्हीआयपींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच हॉटेल, लॉजिंगची तपासणी करून याबाबत माहिती मिळवली जाते. शिवाय, दोन मुली वाळुजच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या, तरीही वाळुज, एमआयडीसी वाळुज पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Trafficking hub for Bangladeshi girls; two more found.

Web Summary : Two Bangladeshi women were trafficked to Chhatrapati Sambhajinagar. Police investigate how and why they were brought there. A hotelier is booked for harboring them illegally. The city has seen similar cases, raising concerns about trafficking networks.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर