प्रमाणपत्रांवरच केली बोळवण !
By Admin | Updated: August 6, 2014 02:20 IST2014-08-06T01:31:11+5:302014-08-06T02:20:33+5:30
हणमंत गायकवाड , लातूर लघु साठवण तलावात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत़ प्रकल्पामुळे काही गावठाण्यांनाही बाधा झाली आहे़ मात्र अनेक

प्रमाणपत्रांवरच केली बोळवण !
हणमंत गायकवाड , लातूर
लघु साठवण तलावात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत़ प्रकल्पामुळे काही गावठाण्यांनाही बाधा झाली आहे़ मात्र अनेक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकले नाही़ शिवाय काही शेतकऱ्यांना मावेजाही मिळालेला नसून १३ हजार ६४३ प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त २२४ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या आहेत़ उर्वरित १३ हजार ४१९ प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर आहेत़ यातील बहुतांश प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांची नोकरीतील वयोमर्यादाही संपली आहे़
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील संगमवाडी, बोळेगाव, अहमदपूर तालुक्यातील उगीलेवाडी, निलंगा तालुक्यातील हनमंतवाडी, देवणी तालुक्यातील आनंदवाडी येथे ३५४ प्रकल्पग्रस्त कुटुबांची संख्या आहे़ या कुटुबांचे कसल्याही प्रकारचे पूनवर्सन झाले नाही़ प्रशासनाने केवळ प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे़ हे प्रमाणपत्र नोकरीसाठी आहे़ जिल्ह्यात १३ हजार ६४३ जणांकडे असे प्रमाणपत्र आहेत़
या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले मात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळू शकली नाही़ यातील फक्त २२४ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत़ उर्वरित १३ हजार ४१९ प्रमाणपत्राची भेंडूळी घेऊन भटकत आहेत़ यातील काहीजणाची तर वयोमर्यादाही नोकरीसाठी बाध झाली आहे़ २५ ते ४५ वर्षांपर्यंतचे १३ हजार १२४ प्रकल्पग्रस्त आहेत़ तर ४५ वयोगटाच्या पुढे २९५ प्रकल्पग्रस्त आहेत़ त्यांनी आत्तापर्यंत प्रकल्पग्रस्त म्हणून अनेक कार्यालयांची दारे ठोठावली़ मात्र त्यांना कुणीही जवळ केले नाही़