गुणवत्तावाढीसाठी सीईओंचा पुढाकार

By Admin | Updated: November 24, 2014 12:40 IST2014-11-24T12:05:41+5:302014-11-24T12:40:02+5:30

जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानाला गती देणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी शिक्षण विभागातील 'स्वच्छता मोहीम'ही तितक्याच वेगाने राबविली आहे.

CEO's initiative for quality enhancement | गुणवत्तावाढीसाठी सीईओंचा पुढाकार

गुणवत्तावाढीसाठी सीईओंचा पुढाकार

 नांदेड : जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानाला गती देणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी शिक्षण विभागातील 'स्वच्छता मोहीम'ही तितक्याच वेगाने राबविली आहे. शौचालय बांधकाम, पाणीटंचाई, अपूर्ण कामे आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तालुकास्तरावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईला प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अंतर्गत वादातून कामे खोळंबली आहेत. पाणीपुरवठय़ासह अन्य विभागांचे कामेही अर्धवटच राहिले आहेत. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेवून काळे यांनी तालुकास्तरावर आढावा बैठक बोलावली आहे. 
बैठकीत उपरोक्त विषयांसह शैक्षणिक गुणवत्ता वाढीवरही चर्चा केली जात आहे. जिल्हा परिषद अधिकार्‍यांना शाळा भेटी देवून तेथील भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमास १९ नोव्हेंबर रोजी किनवटपासून प्रारंभ झाला आहे. 
येथे किनवट, माहूर, हिमायतनगर आणि हदगाव तालुक्याची संयुक्त आढावा बैठक झाली. तर ३ डिसेंबर रोजी भोकरमध्ये भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या तालुक्यांची संयुक्त बैठक होणार आहे. 
१७ डिसेंबरला कंधार पंचायत समितीत कंधार, लोहा व मुखेड आणि २0 डिसेंबर रोजी देगलूर पंचायत समितीमध्ये नायगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर, बिलोली तालुक्याची बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हा परिषदेचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत./
(प्रतिनिधी)

Web Title: CEO's initiative for quality enhancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.