नीती आयोगाचे सीईओ ११ जून रोजी शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:04 IST2021-06-10T04:04:07+5:302021-06-10T04:04:07+5:30
स्मारक उभारणी प्रक्रिया गतिमान करा औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठीची कामे तत्परतेने ...

नीती आयोगाचे सीईओ ११ जून रोजी शहरात
स्मारक उभारणी प्रक्रिया गतिमान करा
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठीची कामे तत्परतेने पूर्ण करत प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्मारक समितीच्या आढावा बैठकीत आ. अंबादास दानवे, सिल्लोड उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देसाई उद्या शहरात
औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई उद्या, शुक्रवारी (दि. ११) पहाटे शहरात येणार आहेत. सकाळी १० वा. जिल्हा विकास निधीतून शहर पोलीस दलास दिलेली वाहने पोलीस सेवेत दाखल करण्याचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर ११.३० वा. शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक ते घेतील.
त्रिमूर्ती चौकातील रस्त्यात खड्डे
औरंगाबाद: त्रिमूर्ती चौकातील रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे किरकोळ अपघात होत आहेत. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलकडे वळण्यासाठी वाहनधारकांना खड्डयांचे अडथळे पार करून जावे लागते.