सीईओंकडून विकास कामांची पाहणी
By Admin | Updated: May 25, 2014 01:03 IST2014-05-25T01:00:41+5:302014-05-25T01:03:59+5:30
बदनापूर : तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी प्रेरणा देशभ्रतार यांनी शुक्रवारी केली.

सीईओंकडून विकास कामांची पाहणी
बदनापूर : तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी प्रेरणा देशभ्रतार यांनी शुक्रवारी केली. तेथील योजनांच्या अंमलबजावणी बाबत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव, शेलगाव, धोपटेश्वर व अंबडगाव या गावांमध्ये भेटी दिल्या. त्यामध्ये बाजार वाहेगाव येथे जलस्वराज योजनेअंतर्गतच्या पाणी टाकीची पाहणी, शेलगाव येथे दोन घरकुल व अंगणवाडीची पाहणी, धोपटेश्वर येथे घरकुल व २५/१५ योजनेतील रस्त्याच्या कामाची पाहणी व शेवटी अंबडगाव येथे रात्री ९ वाजता ग्रामस्थांसोबत गावातील विविध योजनांची अंमलबजावणी होते का, यावर चर्चा केली. या दौर्याच्या पाहणीनंतर भविष्यात पुढील ५० वर्षांचा विचार करून या गावांच्या विकासाकरिता काय उपाययोजना कराव्या लागतील याचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कॅफो, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पंचायत, पाणीपुरवठा अशा विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. विकास कामे पूर्ण झाल्यास गावाचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. (वार्ताहर)बदनापूर तालुक्यातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध विकास कामे करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने घरकुल, रस्ते, अंगणवाड्यांची कामे करण्यात येत आहेत. या कामांमुळे गावांचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. सीईओंनी या कामांची पाहणी करुन कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.