बाटाच्या सीईओपदी
By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:57+5:302020-12-02T04:11:57+5:30
प्रथमच भारतीय व्यक्ती बाटाच्या सीईओपदी प्रथमच भारतीय व्यक्ती नवी दिल्ली : स्वित्झर्लंडस्थित पादत्राणे उत्पादक कंपनी बाटाच्या जागतिक सीईओपदी संदीप ...

बाटाच्या सीईओपदी
प्रथमच भारतीय व्यक्ती
बाटाच्या सीईओपदी
प्रथमच भारतीय व्यक्ती
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडस्थित पादत्राणे उत्पादक कंपनी बाटाच्या जागतिक सीईओपदी संदीप कटारिया यांच्या रूपाने प्रथमच एका भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. ही कंपनी तब्बल १२६ वर्षे जुनी आहे. कटारिया हे २०१७ पासून बाटा इंडियाचे सीईओ आहेत. ते आता ॲलेक्स नसरद यांची जागा घेतील.
...............
‘एफसीसी’चे चेअरमन
अजित पै होणार पायउतार
नवी दिल्ली : अमेरिकेच्या केंद्रीय दळणवळण आयोगाचे चेअरमन अजित पै हे येत्या २० जानेवारी रोजी आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ज्यादिवशी सत्ताग्रहण करणार आहेत, त्याच दिवशी पै हे पदावरून पायउतार होतील. आधीचे एफसीसी चेअरमन टॉम व्हीलर यांनी २० जानेवारी २०१७ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणाच्या दिवशी पद सोडले होते.
..................
कर्मभूमी ॲपद्वारे मिळाल्या
८ हजार आयटी नोकऱ्या
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कर्मभूमी ॲपद्वारे ८ हजार आयटी व्यावसायिकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. प. बंगालचे आयटी विभागाचे संयुक्त सचिव संजय दास यांनी सांगितले की, कोविड-१९ च्या महामारीमुळे राज्यात आयटी व्यावसायिक मोठ्या संख्येने बाहेरून आले आहेत. कर्मभूमी ॲप हे व्यावसायिकांच्या कौशल्य नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
..................
स्मार्टफोनच्या जागतिक
विक्रीत ५.७ टक्के घसरण
नवी दिल्ली : २०२० या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनची वार्षिक आधारावरील जागतिक विक्री ५.७ टक्क्यांनी घसरून ३६.६ कोटी युनिट्सवर खाली आली. गार्टनरने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक आधारावरील ‘एंड यूजर’च्या पातळीवरील एकूण विक्री ८.७ टक्क्यांनी घसरून ४०.१ कोटी युनिट्सवर आली. या विक्रीत २२ टक्के हिस्सेदारीसह सॅमसंग पहिल्या स्थानी असून, त्यापाठोपाठ १४.१ टक्के हिस्सेदारीसह हुआवी दुसऱ्या स्थानी आहे.
................