केंद्रीय पथक आज दोन गावांना देणार भेटी

By Admin | Updated: December 15, 2014 00:41 IST2014-12-15T00:26:05+5:302014-12-15T00:41:42+5:30

जालना : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

Central team to visit two villages today | केंद्रीय पथक आज दोन गावांना देणार भेटी

केंद्रीय पथक आज दोन गावांना देणार भेटी


जालना : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या पथकाकडून सोमठाणा ता. बदनापूर व गोंदेगाव ता. जालना या दोन गावांची पाहणी करण्यात येणार आहे.
१५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता औरंगाबाद येथून सटाणा ता. औरंगाबादकडे या पथकाचे प्रयाण होणार आहे. केंद्रीय सचिव परवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या पथकात डी.एम. घारपुरे, व्यंकट नारायण अंजिना, विजयकुमार बाथल, काळसिंग, वंदना सिंघल, आर.पी. सिंग, गुलजारीलाल यांचा समावेश आहे.
सटाणा येथून हे पथक सकाळी ९.३० वाजता सोमठाणा येथे येणार आहे. तेथील तलावाची पाहणी करून १०.४५ वाजता पथक गोंदेगाव येथे दाखल होईल. तेथे सोयाबीन, कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी ते करतील. ११.१० वाजता पथक गोंदेगाव येथून देऊळगावराजा मार्गे वाशिमकडे प्रयाण करणार आहे.
या पथकाकडून नंतर केंद्र सरकारकडे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष या पथकाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Central team to visit two villages today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.