मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांचे ठाण
By Admin | Updated: October 12, 2014 00:44 IST2014-10-12T00:44:13+5:302014-10-12T00:44:13+5:30
लातूर : मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाची पोलचिट एक पुरावा आहे. त्यामुळे रविवारी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष ठाण मांडून राहणार आहेत.

मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांचे ठाण
लातूर : मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाची पोलचिट एक पुरावा आहे. त्यामुळे रविवारी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष ठाण मांडून राहणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवरून मतदारांना आयोगाची पोलचिट देण्यात येणार आहे. मतदारांकडे पोलचिट पोहोचली नसेल, तर मतदान केंद्रांवरून ती प्राप्त करावी, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेवाळे यांनी केले आहे.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत. या ३०९ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान अधिकारी थांबणार आहेत.
मतदान अधिकाऱ्यांकडे आयोगाने छापलेली पोलचिट असेल. यापूर्वी आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन आयोगाचे पोलचिट वाटप केले आहे. परंतु, अद्यापही अनेक मतदारांपर्यंतपोलचिट गेले नाही. त्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक केंद्रांवर रविवारी मतदान अधिकारी थांबणार आहेत. ज्या मतदारांना मतदान चिठ्ठी मिळाली नाही, त्यांना ती केंद्रावर जाऊन प्राप्त करता येणार आहे. सकाळी १० वाजता लोक घराबाहेर पडतात.
सायंकाळीही ६ वाजेच्या सुमारास बाहेर पडतात. रविवार सुटीचा दिवस असल्याने वेळही मिळतो. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर हा उपक्रम लातूर शहर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. ज्यांना मतदान चिठ्ठी मिळाली नाही, त्यांनी या संधीचा फायदा घेऊन ती प्राप्त करावी, असे आवाहन तहसीलदार महेश शेवाळे यांनी केले. (प्रतिनिधी)