दोन मिनिटांच्या भेटीने भारावले केंद्रेकर

By Admin | Updated: August 27, 2014 01:38 IST2014-08-27T01:32:11+5:302014-08-27T01:38:34+5:30

बीड : कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी म्हणून एक काळ गाजविलेल्या सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी बीडकरांची धावती भेट घेतली़ या भेटीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या प्रेमाचा सुखद अनुभव आला़

Centered by a two-minute meeting | दोन मिनिटांच्या भेटीने भारावले केंद्रेकर

दोन मिनिटांच्या भेटीने भारावले केंद्रेकर

दोन मिनिटांच्या भेटीने भारावले केंद्रेकर
बीड : कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी म्हणून एक काळ गाजविलेल्या सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी बीडकरांची धावती भेट घेतली़ या भेटीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या प्रेमाचा सुखद अनुभव आला़
केंद्रेकर मागील महिन्यापासून कर्नाटक येथे होते़ तेथील पोटनिवडणुकांमध्ये त्यांना निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाने नेमले होते़ कर्नाटकातून ते तुळजापूरमार्र्गे मंगळवारी सपत्नीक औरंगाबादला जात होते़ दुपारी सव्वादोन वाजता त्यांची गाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ थांबली़ केंद्रेकर खाली उतरले अन् त्यांना पाहताच वाहतूक पोलिसाने त्यांना ‘सॅल्यूट’ केला़ ‘कसा आहेस?’ अशा शब्दांत केंद्रेकरांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली़ त्यांना पाहून पादचारी, दुचाकीस्वार यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला़ त्यांनी विचारपूस करत हस्तांदोलन केले़ काहींनी ‘साहेब, चला चहा घेऊ़़़’ असा आग्रह केला़ सर्वसामान्यांची आपुलकी पाहून केंद्रेकर भारावले़ दोन मिनिटांमध्येच गर्दी झाली़ वाहतूक कोंडी होऊ लागताच ते गाडीत बसले अन् निरोप घेतला़ (प्रतिनिधी)

Web Title: Centered by a two-minute meeting