केंद्रांनीच घेतली ‘परीक्षा’
By Admin | Updated: August 8, 2016 00:27 IST2016-08-08T00:24:08+5:302016-08-08T00:27:33+5:30
औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवापूर्व परीक्षेत तब्बल सात हजारांवर उमेदवारांनी दांडी मारली.

केंद्रांनीच घेतली ‘परीक्षा’
औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवापूर्व परीक्षेत तब्बल सात हजारांवर उमेदवारांनी दांडी मारली. शहरातील ३६ केंद्रांवर ५,६०७ जणांनी ही परीक्षा दिली. सातारा, जटवाडासारख्या शहराबाहेरील भागातील केंद्रे लवकर न सापडल्याने उमेदवारांची दमछाक झाली.
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), परराष्ट्र सेवा, महसूल सेवा आदी संवर्गातील सनदी अधिकाऱ्यांची निवड या परीक्षेद्वारे केली जाते. देशभरातील लाखो तरुण या परीक्षेची तयारी करीत असतात. प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांमध्ये नागरी सेवा परीक्षेची प्रचंड क्रेझ बघायला मिळते.
शहरातील ३६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. अकरा पथकांची स्थापना करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. सकाळी नऊ ते साडेअकरा आणि दुपारी अडीच ते साडेचार, अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली. पहिल्या सत्रात १२,८०० पैकी ५,६०७ उमेदवारांनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात ५,६५६ उमेदवारांची उपस्थिती होती.