केंद्र संचालक, पर्यवेक्षकास नोटीस
By Admin | Updated: March 26, 2015 00:55 IST2015-03-26T00:53:04+5:302015-03-26T00:55:46+5:30
उस्मानाबाद : शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील केंद्रामध्ये निर्माण झालेल्या गोंधळ प्रकरणी शिक्षण विभागाकडून संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकास नोटीस बजावली आहे

केंद्र संचालक, पर्यवेक्षकास नोटीस
उस्मानाबाद : शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील केंद्रामध्ये निर्माण झालेल्या गोंधळ प्रकरणी शिक्षण विभागाकडून संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकास नोटीस बजावली आहे. खुलाशासाठी दोन सेमी इंग्रजीच्या परीक्षार्थिंना दिवसांची ‘डेडलाईन’ देण्यात आली.
जिल्हा परिषद कन्या शाळेत रविवारी सकाळी सातवीच्या विद्यार्थ्यांचा गणित व सामाजिक शास्त्र विषयाची परीक्षा होती. सकाळी परीक्षेला सुरुवात होवूनही जवळपास १५ मिनीटे उशिराने विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका देण्यात आली. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी भाषेतील दोन्ही प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित होते. मात्र काही वर्गातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता.
त्यानंतर पालकांचाही मोठा जमाव एकत्रित आला होता. यावेळी पालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत सदरील प्रकरणास जबाबदार असणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यावर शिक्षणाधिकारी जाधव यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्र संचालक आर.एस. पाटील व संबंधित पर्यवेक्षक व्ही.एस. इसाके या दोघांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सदरील नोटिसेचा खुलासा दोन दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देशित केले आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.