केंद्राची समिती जिल्ह्यात
By Admin | Updated: June 23, 2014 00:20 IST2014-06-22T22:58:33+5:302014-06-23T00:20:30+5:30
बीड:जिल्ह्यातील माता व बालकांच्या आरोग्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची समिती रविवारी येथे दाखल झाली़ ही समिती दोन दिवस तळ ठोकणार आहे़

केंद्राची समिती जिल्ह्यात
बीड:जिल्ह्यातील माता व बालकांच्या आरोग्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची समिती रविवारी येथे दाखल झाली़ ही समिती दोन दिवस तळ ठोकणार आहे़
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातील डॉ़ अजय पटले यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय समिती येणार आहे़ सोबत युनिसेफ या आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनचे तीन सदस्यही राहतील़ माता व बालकांच्या आरोग्याची ग्रामीण भागात काय स्थिती आहे याचा ही समिती आढावा घेईल़
बीड व पाटोदा या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांनाही समिती भेट देईल़ सोमवार, मंगळवार अशी दोन दिवस समिती बीडमध्ये राहिल़ त्यानंतर अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)