जिल्ह्यात गुरूपौर्णिमा साजरी
By Admin | Updated: July 13, 2014 00:22 IST2014-07-13T00:04:46+5:302014-07-13T00:22:27+5:30
परभणी : जिल्ह्यात शनिवारी विविध ठिकाणी व्यासपूजा गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात गुरूपौर्णिमा साजरी
परभणी : जिल्ह्यात शनिवारी विविध ठिकाणी व्यासपूजा गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संताई कनिष्ठ महाविद्यालय
मांडाखळी येथील संताई कनिष्ठ महाविद्यालय व इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरूपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष किरण सोनटक्के, रामचंद्र जाधव, गिरी, पी.व्ही. कदम, एस.आर. रोडे, के.डी. शिंदे, एन.एम. राजूरे, यु.डी. कांबळे, ए.बी. चाफाकानडे यांची उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
जेट कीडस्, धर्मापुरी
अध्यक्षस्थानी योगिता देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी ग्यानचंदानी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी जोशी, हराळे, जवळेकर आदींनी परिश्रम घेतले.
विश्वभारती विद्यालय
अध्यक्षस्थानी जे.एन. हरबलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून के.एम. आदमनकर, आर.ए. कुटे, व्ही.एस. कुलाल, ए.जे. शेख, एम.एम. हरबलकर, शेख, चौधरी, केंद्रे, भताने, पाटील, आडे, माळगे उपस्थित होेते. वेदांत लोहट यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश शेळके यांनी आभार मानले. यावेळी ऋषिकेश कुलकर्णी, नम्रता शिंदे, हर्षदा गाडगे, विद्या सोगे यांनी भाषणे केली.
होमहवन व प्रवचन
परभणी येथील विष्णू जिनिंग परिसरात होमहवन व प्रवचनाचा कार्यक्रम झाला. ह.भ.प. शांती महाराज जैन यांचे प्रवचन झाले. यशस्वीतेसाठी दत्तराव कोमाले, सदाशिव यंदे, जगन्नाथ कदम, गिरी महाराज, रोहिदास पवार, बालाजी चव्हाण, रवी शिंदे, डहाळे, अवचार , अंबादास अकुलवाड यांनी केले आहे.
बोबडे पाटील विद्यालय
झरी येथील कै. बाबारावजी बोबडे पाटील माध्यमिक विद्यालयात गुुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मुुख्याध्यापक बी.व्ही. कदम तर प्रमुख पाहुणे म्हणूून प्राचार्य बी.आर. देवकर होते. यावेळी प्रतीक्षा जगाडे, आयशा कुरेशी, तुकाराम हजारे, विशाल खंदारे, सर्जेराव खंदारे, मोहिनी टापरे, विष्णू हिंगे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आर.जी. राठोड, सूत्रसंचालन प्रा. एस.एस. पांढरपोटे, आभार आर.डी. भोसले यांनी मानले.
पृथ्वीराज देशमुख स्कूल
पेडगाव येथील पृथ्वीराज देशमुख इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कपिल देशमुख होते. यावेळी मुख्याध्यापक मोरे, पूजा देशमुख, सारिका रेंगे, दीपाली पंडित, विजयकुमार कसाब, अक्षय देशमुख आदींची उपस्थिती होती. सचिन खिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले.
ज्ञानदीप विद्यालय
अध्यक्षस्थानी आनंद देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून भालेराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व गुरू पौर्णिमेनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यंकटेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
नृसिंह विद्यालय, ब्रह्मपुरी
अध्यक्षस्थानी यु.आर. कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.के. शिंदे, एम.के. सराफ यांची उपस्थिती होती. यु.एस. मोरे यांनी प्रास्ताविक, आर.एम. सुक्रे यांनी सूत्रसंचालन तर एस.यु. महाजन यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी एन.एस. ढगे, भाग्यश्री चव्हाण, एस.पी. चव्हाण, पी.बी. चव्हाण, विलास कुमठेकर, जी.बी. कवडे, शिल्पा चव्हाण, प्रियंका शिंदे, अनुजा पवार, मयूर शेजूळ आदींनी परिश्रम घेतले.
रावसाहेब जामकर विद्यालय
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुदाम लाड तर प्रमुख पाहुणे म्हणून ए.आर. कुबडे, एस.एस. गायकवाड, मनीष देशमुख, भानुदास तिडके यांची उपस्थिती होती. यावेळी तृप्ती शेळके, भक्ती मुक्तावार यांनी भाषणे केली. एस.के. लोढे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
नृसिंह विद्यालय दैठणा
दैठणा येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.डी. गरड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हनुमान व्हरगुळे, एस.आर. बल्लाळ, पी.आर. जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी प्रियंका हरकळ, आरती जगताप, भारती बोबडे, वसंत बल्लाळ यांनी भाषणे केली. कार्यक्रमास बी.यु. रासवे, डी.टी. शिंदे, के.यु. कच्छवे, व्ही.एस. कांबळे, एस.एस. खळीकर, एस.एस. कच्छवे, भगवान कच्छवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.डी. देशमुख यांनी केले.