श्रीराम टेकडीवर रामनवमी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:56+5:302021-04-22T04:05:56+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव जवळील रामटेकडीवर श्रीरामाचे पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आजही सांगितली जाते. यामुळे या ...

Celebrating Ram Navami on Shriram Hill | श्रीराम टेकडीवर रामनवमी साजरी

श्रीराम टेकडीवर रामनवमी साजरी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव जवळील रामटेकडीवर श्रीरामाचे पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आजही सांगितली जाते. यामुळे या श्रीराम टेकडीला धार्मिक महत्त्व आहे. ही रामटेकडी २६ डिसेंबर २०२० रोजी येथील गणेश गिरी महाराजांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आली होती. रामनवमीनिमित्त येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे गतवर्षांपासून यावर बंधने आली आहेत. बुधवारी राम टेकडीवर अल्प भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी सोहळा पार पडला. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी रामटेकडीवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

फोटो : राम टेकडीवर बिडकीन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी करण्यात आली.

210421\20210421_143222_1.jpg

राम टेकडीवर बिडकीन ठाण्याचे सपोनि. संतोष माने यांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी करण्यात आली.

Web Title: Celebrating Ram Navami on Shriram Hill