लातुरात बुद्धजयंती उत्साहात साजरी
By Admin | Updated: May 15, 2014 00:02 IST2014-05-14T23:02:33+5:302014-05-15T00:02:59+5:30
लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातील बुद्धविहार, आंबेडकर पार्क, आंबेडकर चौक, बुद्ध गार्डनसह संस्था, संघटनांच्या वतीने बुद्धजयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली़

लातुरात बुद्धजयंती उत्साहात साजरी
लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातील बुद्धविहार, आंबेडकर पार्क, आंबेडकर चौक, बुद्ध गार्डनसह संस्था, संघटनांच्या वतीने बुद्धजयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली़ बौद्धनगर येथील वैशाली बुद्धविहारात ध्वजारोहणानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली़ यावेळी बाळासाहेब ऊर्फ केशव कांबळे, सूर्यभान लातूरकर, भरत कांबळे, दामू कोरडे, महादेव सातपुते, एच़एस़ गायकवाड, विमलबाई सिरसाट, शारदाबाई कांबळे, कमलाबाई कांबळे, सखुबाई लातूरकर, कौशल्याबाई सोनकांबळे आदींची उपस्थिती होती़ अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध गार्डन येथे बुद्धजयंती साजरी करण्यात आली़ प्रतिष्ठानचे श्यामसुंदर रामलालजी मंत्री यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले़ त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली़ यावेळी बुद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते़ लातूर अर्बन बँक, मिरागी नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने यावेळी बुद्ध गार्डन येथे नेत्रशिबीर घेण्यात आले़ लष्कर-ए-भीमा, अष्टविनायक प्रतिष्ठान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीरही घेण्यात आले़ यावेळी संजय बनसोडे, चंद्रकांत चिकटे, मोहन माने, नवनाथ आल्टे, विजय बनसोडे, प्रा़ शहापूरकर, रणधीर सुरवसे, प्रा़अनंत लांडगे, अर्बन बँकेचे संचालक सुरेंद्र पाठक, गोविंद पारीख, रत्नमाला आंभोरे, अभय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती़ नालंदा बुद्धविहार, संबोधी बुद्धविहार, वैशाली बुद्धविहार, श्रावस्ती बुद्धविहार, रणरागिणी मुद्रिकाबाई सवाई प्रतिष्ठानच्या वतीने बुद्धजयंती साजरी करण्यात आली़ (प्रतिनिधी) प्रज्ञा, शिल, करूणा, न्याय व समतेच्या आधारावर असलेला तथागतांचा बुद्ध धम्म आहे़ त्यामुळे उपासकांनी धम्म विचाराचे पालन करावे, असे संबोधी बुद्ध विहारात जितेंद्र सूर्यवंशी म्हणाले़ यावेळी डॉ़अरूण कांबळे, प्रभाकर आहिरे, यशवंत सूर्यवंशी, सुमनबाई जोगदंड उपस्थित होते़