जिल्हाभरात ईद उत्साहात साजरी

By Admin | Updated: June 26, 2017 23:49 IST2017-06-26T23:45:41+5:302017-06-26T23:49:50+5:30

परभणी : सोमवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली़

Celebrate Eid in the district | जिल्हाभरात ईद उत्साहात साजरी

जिल्हाभरात ईद उत्साहात साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सोमवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली़ ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली़ मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणी शहरात जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठणास सुरुवात झाली. नमाजनंतर विश्वशांती व पावसासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी नमाजचे पठण मौलाना नजीर अहमद यांनी केले. तर ईदचा खुतबाचे पठण मौलाना जहीर अब्बास यांनी केले.
जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, गटनेते भगवान वाघमारे, नगरसेवक गणेश देशमुख, सचिन देशमुख, अ‍ॅड़ विष्णू नवले, जान मोहम्मद जानू, रवी सोनकांबळे, विशाल बुधवंत, लियाकत अली अन्सारी, इरफा नूर रहेमान, अमोल जाधव, उपायुक्त विद्या गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, रामराव गाडेकर, तहसीलदार विद्याचरण कडावकर, तलाठी राजू काजे, अभय मस्के आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या़
साखला प्लॉट परिसरातील ईदगाहमध्ये मुफ्ती कौसर अफाख यांनी नमाजचे पठण केले तर अमीन कॉलनी ईदगाहमध्येही नमाजचे पठण करण्यात आले़ जिल्हाभरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली़

Web Title: Celebrate Eid in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.