बजाजनगरात समर्पण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:36 IST2019-05-14T21:36:32+5:302019-05-14T21:36:43+5:30
संत निरंकारी मंडळ वाळूज शाखेतर्फे बजाजनगर येथे सोमवारी सत्संग कार्यक्रमाने समर्पन दिन साजरा करण्यात आला.

बजाजनगरात समर्पण दिन साजरा
वाळूज महानगर: संत निरंकारी मंडळ वाळूज शाखेतर्फे बजाजनगर येथे सोमवारी सत्संग कार्यक्रमाने समर्पन दिन साजरा करण्यात आला.
सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज यांच्या कृपेने समर्पण दिनाचे औचित्य साधून बजाजनगर येथे सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रमोद विसपुते हे होते. मंच संकलन करण तुपशेंद्रे यांनी केले.
शिवाजी कुबडे यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या सत्संग सोहळ्यास बजाजनगरसह, रांजणगाव, वाळूज, गंगापूर, जिकठाण, वडगाव आदी शाखेतून जवळपास एक हजारापेक्षा अधिक संत महात्मा उपस्थित होते. बाल सत्संगच्या मुलांनी सद्गुरु बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या भरवलेल्या प्रदर्शनाला संत महात्म्यांनी चांगला प्रतिसाद दिला. लंगर प्रसादीने सत्संग कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.