जिल्हाभरात कृषी दिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: July 3, 2017 00:14 IST2017-07-03T00:12:54+5:302017-07-03T00:14:09+5:30
येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयामध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले़

जिल्हाभरात कृषी दिन उत्साहात साजरा
वसंतराव नाईक प्राथमिक विद्यालय
येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयामध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले़ अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस़ पी़ लासीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आव्हाड यांची उपस्थिती होती़ विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर गीते व भाषणे सादर केली़ यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक मालोदे, कुलकर्णी, चौधरी, येळनुरे, आढे, वानरे, सावळे, पवार, मारमवार, अहिरे, जाधव, दुधगोंडे, चाऊस आदींनी परिश्रम घेतले़
शारदा महाविद्यालय
येथील शारदा महाविद्यालयामध्ये जागतिक वृक्षारोपण दिन व वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली़ यावेळी संस्था सचिव हेमराज जैन व अॅक्सीस बँकेचे अधिकारी आऱ एस़ देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ या प्रसंगी डॉ़ प्रशांत मेने, उपप्राचार्य डॉ़ श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ़ एच़ डी़ शेवाळे, डॉ़ एऩ व्ही़ सिंगापुरे, डॉ़ गोपाळ पेदापल्ली, प्रा़ एस़ एऩ कुलकर्णी, डॉ़ ए़ बी़ शिंदे, डॉ. दत्ता चामले, सुरेश जयपूरकर, नागुल्ला, तुकाराम पवार, भगवान रिठाड आदींनी परिश्रम घेतले़
जिंतूर येथे कार्यक्रम
जिंतूर- येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली़ उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, शंकर स्वामी, दीपक डोंबे, बाळू तळेकर, सौरभ घुगे, राजू घुगे, पीयूष शिंदे, आकाश राठोड, निलेश राठोड, पंढरी गायकवाड, महेश काळे, पिंटू राठोड, बंटी जाधव, पिंटू डोंबे, गजू दाभाडे, संदीप राठोड, पिंटू देवळे, रवि विखे, गजू सातपुते, बबलू राठोड, अविनाश मेहता आदींची उपस्थिती होती़
आदिती विद्यालय
कुऱ्हाडी- जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथील आदिती कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले़ यावेळी चेअरमन देवीदास इंझे, माजी सरपंच नारायण इंझे, संस्थाध्यक्ष लक्ष्मण वाव्हळे, प्रकाश वाव्हळे, शेषराव इंझे, रवि पवार, सुनील सोळंके, उद्धव पवार, सचिन इंझे आदींची उपस्थिती होती़
वेदांत विद्यालय
गंगाखेड येथील वेदांत विद्यालयात कृषी दिन साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापक उदय कुलकर्णी, चंदा पेकम, चिलवंत कांबळे, दांडेगावकर, पौळ, भारती आदींची उपस्थिती होती़
जिंतूरमध्ये वृक्षारोपण
जिंतूर येथील १३२ केव्ही उपकेंद्रामध्ये महापारेषण परभणी विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर शेंदूरवाडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ उपकेंद्रामध्ये ३५ झाडांची लागवड करण्यात आली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी पाच झाडांचे पालकतत्व स्वीकारले आहे़ गतवर्षी लावण्यात आलेल्या ५० पैकी ३४ झाडांची चांगली वाढ झाली आहे़ यावेळी उपकार्यकारी अभियंता महेश देशपांडे, जावेद पठाण, एम़ए़ मुंडे, एऩयू़ कदम, एनक़े़ पवार, एऩएम़ काबदे, एऩएस़ लाटकर, गोरीबी, प्रमोद वावळे आदींची उपस्थिती होती़
माटेगाव आरोग्य उपकेंद्र
पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये ४ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले़ सरपंच माधव सातपुते, आरोग्य सेविका बी़ एस़ गवई, एस़ बी़ वाघमारे, देशपांडे, तुळशीराम बोबडे, बाबूराव बोबडे, नवनाथ बोबडे, दीपक बोबडे, सुरेश बोबडे, शिवाजी बोबडे, हुसेकर आदींची उपस्थिती होती़
पंचायत समिती, पाथरी
येथील पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले़ यावेळी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, माजी जि़ प़ सभापती दादासाहेब टेंगसे, गटविकास अधिकारी बी़ टी़ बायस, राजेशराव ढगे, कक्ष अधिकारी सतीश कुलकर्णी, संध्या वडकुते, रवि पोटपल्लेवार, कृषी अधिकारी एस़ व्ही़ कुपटेकर, वरिष्ठ सहायक सोपान कटारे, तिडके, डख, गाजरे, माने, पौळ, पोतदार, रेवणवार, डी़ के़ जाधव, शंकर पुरी, चंद्रशेखर भदर्गे आदींची उपस्थिती होती़
ज्ञानराज प्रतिष्ठान
परभणी येथील वृंदावन कॉलनीतील ज्ञानराज प्रतिष्ठानमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली़ नगरसेवक प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष निलाकांत जाधव, राजेश जाधव, निशांत हाके, राजू पवार, राजू कदम, विलास साखरे आदींची उपस्थिती होती़
प्रिन्स अकॅडमी, सेलू
सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडमी येथे डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ४ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली़
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ़संजय रोडगे, सचिव डॉ़ सविता रोडगे, डॉ़जवळेकर, डॉ़ नखाते, डॉ़ अरविंद बोराडे, डॉ़ मदिना हावळे, डॉ. मालपाणी, डॉ़ गात, डॉ़ काष्टे, डॉ़ कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी प्रा़ महादेव साबळे, प्राचार्या प्रीती सॅम्युअल, मेरीना आदींची उपस्थिती होती़ यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व डॉक्टरांना रोपटे देऊन सन्मान करण्यात आला़ मान्यवरांच्या हस्ते २०१ रोपांची लागवड करण्यात आली़